Women Death
Women DeathPudhari

Murbad Ashram School: मुरबाड आश्रमशाळा विद्यार्थिनी जीव संपवण्याप्रकरणी प्रकल्प अधिकारी निलंबित

विधानसभेत आ. संजय केळकर यांनी उपस्थित केला मुद्दा; मंत्री अशोक उईके यांच्या निर्देशानंतर कारवाई
Published on

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील आश्रम-शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापक व स्त्री अधीक्षिकेला निलंबित केले तरी प्रकल्प अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी आ. संजय केळकर यांनी विधानसभेत केली. त्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या निर्देशानंतर शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले.

Women Death
Mira Bhayander Municipal Corporation: मिरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी हसमुख गेहलोत; महिला-बालकल्याण समितीत भाजपचा दबदबा

येथील आश्रमशाळेतील एका दहावीच्या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण गेल्यावर्षी 25 डिसेंबरला घडले होते. या प्रकरणी आ. संजय केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली होती.

Women Death
Plastic Free Mumbai: प्लास्टिकमुक्त मुंबईसाठी महापालिकेची पुन्हा मोहीम; दुकानदारांवर ५ ते २५ हजारांचा दंड

आश्रमशाळेतील घटनेप्रकरणी जबाबदार अधिकारी असलेले प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाईच झालेली नसून तेच इतरांचे निलंबन करत असल्यामुळे तातडीने प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्याची जोरदार मागणी आ. संजय केळकर यांनी अधिवेशनात केली. त्याचबरोबर पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचीही त्यांनी मागणी केली. यावर उत्तर देताना मंत्री अशोक उईके यांनी अशी प्रकरणे आश्रमशाळांमध्ये वारंवार होत असल्याचे मान्य केले. या प्रकरणी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

Women Death
Mumbai University: मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पसमध्ये प्रवेश रोखल्याचा आरोप; दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांना गेटवर थांबवले

आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी 25 डिसेंबरला चौकशी समिती गठित करण्यात आली तर 26 डिसेंबरला अहवाल प्राप्त होऊन आश्रमशाळा मुख्याध्यापक आणि स्त्री अधीक्षिका यांना निलंबित करण्यात आले. तसेच पीडित कुटुंबाला दोन लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आल्याची माहिती उईके यांनी दिली.

Women Death
Sewage Water Treatment Mumbai: सांडपाण्यावर प्रक्रिया करून मुंबईत पिण्याचे पाणी तयार होणार; कुलाबा प्रकल्पातून दररोज 1.20 कोटी लिटर पाणी

यावर केळकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्यात येणार आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

अखेर मंत्री उईके यांनी निर्देश दिल्यानंतर अखेर प्रकल्प अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news