

ठाणे : मुंब्रा हिरवा करीन मुंब्रा प्रभाग 30 मधील नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांना त्यांचे वक्तव्य महागात पडणार असल्याचे चित्र आहे. शेख यांच्या वक्तव्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी सहर शेख याना नोटीस बजावली आहे.
मुंब्रा प्रभाग 30 मधील नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख या एमआयएम नेते युनूस शेख यांची मुलगी आहे. यंदाच्या नुकत्याच झालेल्या महानगर पालिकेतून सहर शेख यांनी एमआयएम पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. निवडणुकीत त्यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी मुंब्रावासियांना संबोधित करताना मुंब्रा हिरवा करीन असे वक्तव्य केले. याच विधानावर किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला.
नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या पक्षाचा एमआयएमचा झेंडा हिरवा आहे. आणि संपूर्ण मुंब्रा हा हिरवा करण्याचा निर्धार केल्याने त्यांच्यावर आक्षेप घेऊन मुंब्रा पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांनी लेखी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत नवनिर्वाचित एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हणाल्या आपण त्या लोकांच्या अहंकाराच्या चिंधड्या उडवल्या. काहींना वाटत होतं आम्ही त्यांचे गुलाम आहोत, पण आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे. आम्ही कोणाच्या बापाचे मिंधे नाही, असा टोलाही आव्हाड यांना शेख यांनी लगावला. तर पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा यापेक्षा मोठे प्रत्युत्तर द्यायचे आहे. संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे, असे विधानही त्यांनी केले. दरम्यान, सहर शेख यांच्या भाषणतील ‘पूर्ण मुंब्रा हिरवा करुन टाकू’, या विधानावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.