Mumbra Train Accident | काही लोकलमधून ट्रॅकवर पडले, तर काही प्रवाशी २ रेल्वेमध्ये अडकले; घटनास्थळावरील भीषणता समोर

मुंब्राजवळील वळणावर अपघात, मृतांत रेल्वे पोलिसाचा समावेश
Mumbra Train Accident
मुंब्रा स्टेशनजवळ 5 प्रवाशांचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला.(ANI X)
Published on
Updated on

Diva Mumbra Train Accident Local Train 5 Death

ठाणे : कसाराहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकलच्या दरवाज्यात उभे राहून प्रवास करणाऱ्या पाच प्रवाशांचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.९) सकाळी मुंब्रा स्टेशन जवळ घडली. तर या घटनेत 9 जण जखमी झाले आहेत. जखमींवर कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये एका रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कसाराकडून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी फास्ट लोकल सोमवारी सकाळी 9.20 वाजेच्या सुमारास मुंब्रा स्थानकाजवळील वळणावर आली असताना बाजूने एक एक्स्प्रेस जात होती. या दोन्ही रेल्वे गाड्या भरधाव वेगात असतांना वळणावर एकमेकांना घासल्या गेल्या. त्यामुळे लोकलच्या दरवाज्यात उभे असलेले काही प्रवाशी लोकलमधून बाहेर ट्रकवर पडले. तर काही प्रवाशी दोन्ही रेल्वेच्या मध्ये अडकले गेले. त्यात एकूण पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली. तर एकूण 9 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यात काही प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींवर कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयतांमध्ये विकी बाबासाहेब मुख्यदल या 34 वर्षीय रेल्वे पोलिसाचा देखील समावेश आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Mumbra Train Accident
Mumbai Railway Accident: धावत्या लोकल ट्रेनमधून ११ प्रवासी पडले, मृतांची आकडेवारी समोर; मुंब्रा स्थानकावरची घटना

जखमी प्रवाशी  व मृतदेह बराचवेळ ट्रॅकवर पडून

या अपघातानंतर मुंब्रा स्थानकानजीक जखमी व मृतदेह बराचवेळ ट्रकवर पडलेले होते. जवळूनच रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू होती. काही वेळेनंतर घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या रेल्वे कर्मचारी पथकाने ट्रॅकवरून मृतदेह उचलून बाजूला केले. दरम्यान, या घटनेबाबत रेल्वे प्रशासनच अनभिज्ञ असल्याचे समोर आले. एकूण 13 प्रवाशी लोकल मधून पडल्याची प्राथमिक माहिती असून त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली.

अपघातात रेल्वे पोलीस कर्मचारी मृत

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाण्यासाठी धडपडणाऱ्या चाकरमान्यांना अशा प्रकारे आपला जीव गमवावा लागेल याची कल्पना देखील कुणी केली नव्हती. कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल 9.15 वाजेच्या सुमारास दिवा स्थानकात आली तेव्हा लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे काही जण दिवा येथून लोकल मध्ये चढले परंतु त्यांना आता जाता न आल्याने ते दरवाज्यातच उभे राहिले. ही लोकल मुंब्रा स्थानकाजवळील वळणावर आली असतांना एक एक्स्प्रेस गाडी त्याचवेळी लोकल जवळून भरधाव वेगात गेली. दोन्ही गाड्या वळणावर असल्याने या गाड्या एकमेकांना घसल्या गेल्या. व त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात केतन दिलीप सरोज (वय 23, रा. तानाजी नगर, उल्हासनगर), राहुल संतोष गुप्ता, विकी बाबासाहेब मुख्यदल ( वय 34, रेल्वे पोलीस कर्मचारी) आणि इतर दोन अज्ञात प्रवाशांचा जागीच मृत्य झाला. विकी बाबासाहेब मुख्यदल हा मृत ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात कर्मचारी होता. त्याची नुकतीच कल्याण येथून ठाण्यात बदली झाली होती.

Mumbra Train Accident
Mumbra Train Accident | केतन सरोजचा लोकलचा प्रवास ठरला अखेरचा! दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू

अपघातातील  जखमींची नावे

या अपघातात नऊ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवा गवळी या 23 वर्षीय तरुण व अनिल मोरे (वय 40) या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवण्यात आले. तर आदेश भोईर (वय 26 , रा. आढगाव, कसारा), रिहान शेख (वय 26, रा. भिवंडी), तुषार भगत (वय 22 ), मनीष सरोज ( वय 26), दिवा साबेगाव, (रा. दिवा), मच्छिंद्र गोतारणे (वय 39, रा. वाशिंद), स्नेहा धोंडे (वय 21, रा. टिटवाळा), प्रियंका भाटिया (वय 26, रा.शहाड, कल्याण) आदी जखमींवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news