

नरेंद्र राठोड, ठाणे
मुंब्रा पोलीस पथकाने दिवा-मुंब्रा परिसरात एमडी व कोकेन विक्री करणाऱ्या एकूण सात नायझेरियन ड्रग्ज तस्करांना वेगवेगळ्या कारवाईत नुकतीच अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या चौकशीतून ड्रग्स स्मगलिंग, इमेल हकींग, सोशल मीडिया अकाउंट हॅकिंग, ऑनलाईन फसवणुक आदी गुन्ह्यात नायझेरियन नागरिकांचा सर्वाधिक सहभाग असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबई व मीरा भाईंदर, वसई विरार पोलिसांनी नायझेरियन नागरिकांच्या विरोधात कारवाई मोहीम सुरू केल्यानंतर हे नायझेरियन नागरिक मुंब्रा-दिवा परिसरात आपले बस्तान बसवत असल्याचे पोलीस कारवाई वरून दिसत आहे.
कोकेन, चरस, अफिंग, गांजा व इतर प्रचलित ड्रग्स बरोबरच काही ड्रग्ज माफिया आता अनेक विदेशी ड्रग्जची तस्करी करून त्यास ठाण्यात रुजवण्यास व त्यांची तस्करी करण्यास सुरुवात करत आहेत.
या ड्रग्स विक्रीत नायझेरिन नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे समोर येत आहे. विदेशातून तस्करी करून भारतात आणलेल्या कोकेनसह मेफेड्रॉन अर्थातच एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या तीन नायझेरियन नागरिकांना मुंब्रा पथकाने दिवा परिसरातून 14 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. या तिघा नायजेरियन ड्रग्ज पेडलर्सच्या ताब्यातून दोन किलो कोकेन व मेफेड्रॉन (एमडी) असा एकुण 10 कोटी 93 लाखाचे ड्रग्ज जप्त करण्यात करण्यात आले आहे.
तर यापूर्वी 29 ऑक्टोबर रोजी मुंब्रा परिसरातून अमली पदार्थ विक्री करणाऱ्या चार नायझेरियन नागरिकांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून 1 कोटी 50 लाख 27 हजार 500 रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.
एका महिन्याच्या आत या दोन्ही कारवाईतून मुंब्रा पोलिसांनी एकूण सात नायझेरियन ड्रग्ज तस्करांना अटक केल्याने दिवा-मुंब्रा परिसरात पुन्हा नायझेरियन ड्रग्ज पेडलर्सचे जाळे उभे राहत असल्याचे स्पष्ट होत आहे. या गुन्ह्याच्या तपासातून नायझेरियन नागरिक मुंबई ठाण्यात घातक विदेशी ड्रग्जचे लोण पसरवत असल्याचे समोर आले आहे.
मुंबई शेजारी वसलेल्या नवी मुंबई, मिरारोड, भाईंदर, वसई, विरार, नालासोपारा आदी भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या नायझेरीयन नागरिकांच्या गुन्हेगारी हालचाली रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई मोहीम हाती घेऊन या बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या परदेशी नागरिकांवर प्रतिबंध घालण्यास सुरवात केल्यानंतर आता हे नागरिक दिवा मुंब्रा परिसरात आपले ड्रग्ज विक्रीचे जाळे निर्माण करीत असल्याचे पोलीस करवाईतून समोर येत आहे.
जास्त भाड्याच्या लालसेने सहज घरे उपलब्ध
नालासोपारा, मिरारोड, वसई, विरार, मुंब्रा, दिवा आदी भागातनायझेरीयन लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. स्थानिक लोकांपेक्षा नायझेरीयननागरिक जास्त घरभाडे देत असल्याने त्यांना राहण्यास अगदी सहज घर उपलब्ध होतात. विशेष म्हणजे या भागात राहणारे नायझेरीयन नागरिक कुठून येतात, कुठे जातात, काय करतात याची कुठलीही माहिती घरमालकांकडे अथवा पोलिसांकडे उपलब्ध नाही.
नायझेरिन नागरिकांना घर भाड्याने देतांना त्यांची सर्व माहिती घ्या व रीतसर नोंदणी करून त्यांची माहिती पोलिसांना कळवा असे आदेश पोलिसांनी काढले आहेत. तरी देखील काही जण जास्त भाड्याच्या लालसेने या नायझेरिन नागरिकांची कुठलीही माहिती पोलिसांना न देता त्यांना घरे भाड्याने देतात.
दिवा मुंब्रा परिसरातील नाझेरियन नागरिकांवर काही वर्षांपूर्वी तत्कालीन ठाणे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मी नारायण यांच्या आदेशानंतर कठोर कारवाई मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर दिवा मुंब्रा परिसरातून नायझेरिन नागरिकांचे उच्चाटन झाले होते. मात्र आता पुन्हा हे नायझेरियन नागरिक दिवा मुंब्रात परंतु लागले आहेत.
गुन्हेगारी हाच धंदा
नायझेरियन नागरिक अनेक गुन्हेगारीची कामे करतात. नायझेरियन नागरिकांचा सर्वात मोठा सहभाग आढळून येतो तो म्हणजे ड्रग्ज स्मगलिंगमध्ये. नायझेरियन नागरिक हे जन्मजात ड्रग्जच्या आहारी गेलेले असतात. त्यामुळे त्यांच्याकडे अमली पदार्थांचा साठा कायम सोबत असतो. हे नायझेरिन नागरिक ड्रग्ज पदार्थ सेवन करण्याबरोबरच त्याची विक्री देखील मुंबई, ठाणे परिसरात करतात. काही वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी उघड केलेले बहुचर्चित 2 हजार कोटींचे इफेड्रीन प्रकरण देखील एका नायझेरिन नागरिकांच्या अटकेमुळे उघड झाले होते.
ठाणे आयुक्तालयात दोन महिन्यांच्या काळात 11 नायझेरियन नागरिकांना अमली पदार्थ विक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रमाणेच ऑनलाइन फसवणुकीत देखील नायझेरियन नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आढळून येतो. विवाह जुळवणाऱ्या वेबसाईटवर फेक अकाउंट बनवून विवाहइच्छुक महिलांची फसणूक करण्यापासून तर जेष्ठ नागरिकांना विदेशी कंपनीत जॉब ऑफर देऊन फसवणूक करण्याइतपत या नागरिकाकांचा सहभाग पोलीस तपासून उघड झाला आहे.
पर्यटनाचा विजा घेवून भारतात येतात
भारतात येणारे बहुतांश नायझेरीयन नागरिक हे पर्यटनाचा विजा घेवून येतात. मात्र भारतात आल्यावर हे नागरिक परत जातच नाहीत. भारतात आल्यावर हे नागरिक आपला पासपोर्ट लपवून ठेवतात अन एखादवेळी पोलिसी कारवाई झालीच तर आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा पासपोर्ट नाही, तो हरवलाय, चोरीला गेलाय असे बहाणे बनवतात. त्यामुळे पोलिसांना देखील कारवाई करणे अवघड होते अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. या अनधिकृतपणे राहणाऱ्या नायझेरीयन नागरिकांवर बांगलादेशी नागरिकांप्रमाणे कारवाईचे आदेश सरकारने दिले तरच त्यांना रोखणे शक्य होईल असे देखील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.