Mumbra Baby Sale Case: वीस दिवसांच्या बाळाची अडीच लाखांत विक्री; दहा जणांच्या टोळीस अटक

मुंब्रा पोलिसांनी केली बाळाची सुखरूप सुटका
Mumbra Baby Sale Case
Mumbra Baby Sale CasePudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: जन्मदात्या आईलाच आपल्या वीस दिवसीय बाळाची अडीच लाखात विक्री करण्यास भाग पाडणाऱ्या आरोपीसह दहा जणांच्या टोळीस मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. तर विक्री करण्यात आलेल्या बाळाची रत्नागिरी येथून पोलिसांनी सुखरूप सुटका केली.

बाळास ठाण्यात आणून त्यास डोंबिवली येथील संस्थेत पालन पोषणासाठी ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिली.

Mumbra Baby Sale Case
Murbad car theft: नगरसेवकाच्या कारमधून ९ लाख लंपास; मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर भरदिवसा चोरी

मुंब्रा येथील अनिसा (१९, शांतीनगर, कळवा) या महिलेने मुंब्रा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वीस दिवसांचे बाळ आरोपी रेहान शेख (२२, मुंब्रा) याने विक्री करण्यास भाग पाडले होते.

सदरच्या बाळाची अडीच लाख रुपयात विक्री करण्यात आली होती. या अडीच लाखांपैकी १ लाख २० हजार रुपये आरोपीने बाळाच्या आईला दिले होते.

मात्र, आरोपी रेहान याने बाळाच्या आईला व तिच्या बहिणीला वायरने मारहाण करून ही दिलेली रक्कम परत हिसकावून घेतली. त्यानंतर बाळाच्या आईने या प्रकाराची ५ नोव्हेंबर रोजी मुंब्रा पोलिसात तक्रार दाखल केली.

मुंब्रा पोलिसांनी बाळाच्या विक्रीच्या गंभीर घटनेची दखल घेत तत्काळ गुन्हा दाखल करून बाळाच्या शोधासाठी व आरोपींना पकडण्यासाठी पाच पथके बनवून तपास सुरू केला.

Mumbra Baby Sale Case
Nagpur Pune Sleeper Vande Bharat Express: मुंबई-बंगळुरूनंतर नागपूर-पुणे स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार; प्रवाशांमध्‍ये उत्सुकता

पोलिसांनी बाळाच्या आईने दिलेल्या माहितीवरून काही तासातच आरोपी रेहान याच्यासह बाळाची विक्री करणाऱ्या टोळीतील ज्योती पाटील (३५), फरहान ऊर्फ फरी रेहान शेख (२७), फरीदा (५२), हुरना ऊर्फ हुस्ना अल्ताफ शेख (२७), अनिता धोत्रे (४२), सुनीता खैरनार (३०) यांना अटक केली आहे. तर या प्रकरणात एका पोलीस पथकाने गोपीनाथ धोत्रे (रा. घणसोली खुर्द, जिल्हा जालना) यास जालना येथून अटक केली.

दरम्यान, या आरोपींच्या तपासातून विक्री करण्यात आलेले बाळ रत्नागिरी येथे असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मुंब्रा पोलिसांच्या अन्य एका पथकाने रत्नागिरी गाठून प्रतिभा परब(४६, रत्नागिरी) आणि शिल्पा साठे (३४, दिवा) या दोघा महिलांना अटक करून विक्री करण्यात आलेल्या बाळाची सुखरूप सुटका करून त्यास आपल्या ताब्यात घेऊन ठाण्यात परत आणण्यात यश मिळवले. या बाळास डोंबिवली येथील संस्थेत पालन पोषणासाठी ठेवण्‍यात आले आहे.

आरोपींना १० नोव्‍हेंबरपर्यंत कोठडी

अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीअसून या टोळीने आणखी देखील काही बाळांची खरेदी विक्री केली आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

तर सुटका करण्यात आलेल्या बाळाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बालकल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली त्यास डोंबिवली येथील संस्थेमध्‍ये पालन पोषणासाठी ठेवण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वृषाली पवार करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.