Mumbra Kidnapping Case: कांदा व्यवसायातील नुकसान वसुलीसाठी भाजीपाला व्यावसायिकाचे अपहरण

जंगलात नेऊन मारहाण, चाकूचा धाक दाखवत १९ लाखांचा ऐवज लुटला
kidnapping case
kidnapping casePudhari Photo
Published on: 
Updated on: 

ठाणे: आखाती देशातील दुबई येथे कांद्याच्या व्यवसायात झालेल्या सात लाखांच्या नुकसानीच्या वसुलीसाठी भाजीपाला व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नुकसानीच्या वसुलीसाठी रेहान याने तक्रारदार फैजन सय्यद यांच्याकडील फॉर्च्युनर, आयफोन आणि रोकड मिळून १९.२२ लाखांचा ऐवज लुटला असल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे.

kidnapping case
Konkan Hapus Mango GI Tag: हापूसच्या ‘जीआय’ मानकाचे रक्षण करण्याचे आव्हान

तक्रारदार फैजान सय्यद (वय २८) यांचा कांदा, बटाटा आणि भाजीपाला निर्यातीचा व्यवसाय आहे. जानेवारी २०२६ मध्ये जुबेर याने त्यांना दुबईत कांदा विक्रीचा व्यवहार दिला होता. या व्यवहारात जुबेरचे सुमारे साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले होते. याच नुकसानीची रक्कम वसूल करण्यासाठी जुबेरने रेहान याला वसुलीचे काम दिल्याचा आरोप आहे.

२ नोव्हेंबर रोजी रेहानने फोनवरून फैजान यांच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर २० नोव्हेंबरला सकाळी सव्वानऊच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती फैजान यांच्या मुंब्रा येथील घरी पोहोचला. त्याने रेहानशी फोनवर बोलणे करून दिले. रेहान इमारतीच्या खाली थांबला असल्याचे सांगितल्यानंतर फैजान खाली गेले.

kidnapping case
Purandar Water Shortage: पुरंदरमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद; अंबाजीचीवाडीचा तलाव कोरडा, ग्रामस्थांची टँकरची मागणी

दरम्यान तेथे रेहानने त्यांना स्वतःच्या फॉर्च्युनर गाडीत बसवून घेतले. यावेळी पुढे आणखी एक साथीदार गाडीत बसला. त्यानंतर मुंब्रा येथून मुलुंडमार्गे आरे कॉलनीतील फिल्टरपाडा परिसरातील जंगलात त्यांना नेण्यात आले.

मुंब्रा ते फिल्टरपाडा जंगल या प्रवासादरम्यान दोघांनी फैजान यांना मारहाण केली. चाकूचा धाक दाखवत तीन लाख रुपये देण्याची मागणी केली. तसेच त्यांच्या गुगल पेच्या माध्यमातून दहा हजार रुपयांचे दोन व्यवहार करून २० हजार रुपये काढून घेण्‍यात आले.

जंगलात पोहोचल्यानंतर आरोपींनी गाडीतच अमली पदार्थांचे सेवन केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. अखेर मारहाण करून तक्रारदार फैजान यांना जंगलात सोडताना, तीन लाख रुपये दिल्यानंतरच गाडी आणि मोबाईल परत मिळतील, अशी धमकी देण्यात आली. पैसे जमा केल्यानंतर एका विशिष्ट मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपल्या माणसाकडे पैसे देण्यास सांगण्यात आले. पोलिसांना सोबत आणल्यास गाडी जाळून टाकण्याची धमकीही आरोपींनी दिली.

तिघांवर गुन्हा दाखल

कांदा नुकसानीच्या वसुलीपोटी व्‍यावसायिक फैजन यांच्याकडे असलेली १७ लाख रुपयांची फॉर्च्युनर, एक लाख ८० हजार रुपयांचा आयफोन, २० हजार रुपयांचे मनगटी घड्याळ आणि गुगल पेवरून काढलेले २० हजार रुपये असा एकूण १९ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार रेहान तसेच त्याचा अनोळखी साथीदार आणि जुबेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.