Konkan Hapus Mango GI Tag: हापूसच्या ‘जीआय’ मानकाचे रक्षण करण्याचे आव्हान

इतर भागांतील दाव्यांमुळे ‘ट्रेडवॉर’ची शक्यता; कोकण हापूस सहकारी संस्था अध्यक्ष डॉ. विवेक भिडे
Alibaug Hapus Mango
Alibaug Hapus MangoFile Photo
Published on: 
Updated on: 

रायगड: कोकणच्या हापूस आंब्याला मिळालेले भौगोलिक मानांकन (जीआय) आणि त्याचे मूळ स्वरूप जपण्यासाठी आता कायदेशीर, सामाजिक आणि राजकीय पातळीवर भक्कम लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे.

इतर प्रदेशांतील शेतकरी व व्यावसायिकांकडून ‘हापूस’ नावाचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने कोकणच्या या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीवर गदा येण्याचा धोका ‘कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित, रत्नागिरी’चे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी व्यक्त केला आहे.

Alibaug Hapus Mango
Mumbai Crime News: मोजमापाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; फेरीवाल्याविरुद्ध पोक्सोचा गुन्हा

कोकणातील हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळावे, यासाठी २००८ मध्ये संस्थेची स्थापना झाली आणि सलग दहा वर्षांच्या प्रयत्नांनंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये हे मानांकन प्राप्त झाले.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांसाठी हे मानांकन असून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली), देवगड तालुका आंबा उत्पादक संघ, केळशी परिसर हापूस उत्पादक संघ आणि कोकण हापूस आंबा उत्पादक व उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित (रत्नागिरी) या चार संस्थांना ते मिळाले आहे.

देशात जीआय नोंदणीसाठी आतापर्यंत १६७३ अर्ज दाखल झाले असून ७०३ निविष्ठांना मानांकन मिळाले आहे, त्यापैकी महाराष्ट्रातील ५५ निविष्ठांचा समावेश आहे. हापूसच्या जीआय नोंदणीत शेतकरी व प्रक्रियादार मिळून २१४० नोंदणी झाल्या असून अधिकृत नोंदणीमध्ये कोकणातील हापूस शेतकरी व प्रक्रियादार देशात आघाडीवर आहेत.

Alibaug Hapus Mango
Tamhini Ghat Road Accidents: नागमोडी ताम्हिणी घाट की मृत्यूचा सापळा? तीन वर्षांत ९५ अपघातांत ३९ जणांचा मृत्यू, १७५ जखमी

‘प्रिफिक्स-सफिक्स’ नसल्याची बाब आणि परदेशातील उदाहरण देशातील अनेक नोंदणीकृत जीआय निविष्ठांना नावामागे-पुढे उपसर्ग किंवा प्रत्यय (प्रिफिक्स व सफिक्स) जोडलेले आहेत; मात्र हापूस आंबा, बासमती तांदूळ आणि फेणी यांसारख्या निवडक निविष्ठांना असा उपसर्ग-प्रत्यय नसल्याने त्या विशिष्ट भागापुरत्या मर्यादित आहेत.

आफ्रिकेतील मलावी देशात कोकणातून कलमे नेऊन लागवड करण्यात आली आणि २०१६ पासून ‘मलावी हापूस’ नावाने आंबा भारतात येऊ लागला. २०१८ मध्ये जीआय मानांकन मिळाल्यानंतर संस्थेने कायदेशीर आक्षेप नोंदवल्यानंतर आता तेथे ‘मलावी मँगोज’ या ब्रँडनेमने विक्री सुरू झाली आहे, ज्यामुळे जीआय मानांकनाचे महत्त्व स्पष्ट होते.

वलसाड, जुन्नरच्या दाव्यांविरोधात विरोध याचिका इतर भागांतील आंब्याला ‘हापूस’ नावाने विकून बाजारपेठेत गैरफायदा घेतल्याचे प्रकार घडत असल्याने संस्थेकडून जनजागृती सुरू आहे.

२०२३-२४ पासून गुजरातच्या वलसाड येथून ‘वलसाड हापूस’ आणि जुन्नर येथून ‘जुन्नर हापूस’ नावाने जीआय मानांकनासाठी चेन्नई येथील कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जांविरोधात संस्थेने व कोकण कृषी विद्यापीठाने संबंधित प्राधिकरणाकडे विरोध याचिका दाखल केली असून वलसाड हापूसची सुनावणी पूर्ण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.