

ठाणे: वाहणाऱ्या घामाच्या धारा, आणि मे महिन्याच्या उत्तराधार्थ पडलेल्या पावसाच्या अचानकच्या रविवारी पहाटे पडलेल्या सरीने ठाणेकर तूर्तास थंडावले मात्र रविवारी पुन्हा घामाच्या धारा वाहिल्याने आणि पाऊस थंडावल्याने ठाणेकरांच्या हिरमुस झाला.
अनेक दिवसापासून ठाण्यात उष्म्याने प्रमाण अगदी 40 सेल्सियस पार झालेले होते. दरम्यान यंदा जून पूर्वीच पाऊस पडणार असे गृहीत धरण्यात येत होते. सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने ठाणेकरांच्या अशा पल्लवित झाल्या.
मात्र ठाण्यात पाऊस पडलाच नाही. तर शनिवारी मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. तर रविवारी पहाटे 3-30 वाजण्याच्या सुमारास 0.25 मिमी पाऊस पडला तुरळक सारी पडल्या. त्यानंतर रविवारी सकाळी 7-30 वाजण्याच्या सुमारास 3.05 मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली. त्यानंतर तासाभराने सकाळी 8-30 वाजण्याच्या सुमारास पहाटे प्रमाणे पुन्हा तुरळक सरी पडल्या ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने नोंद केलेला पाऊस हा 0.25 इतका नोंद केला.
तापमान 35 डिग्रीवर आले...हलकासा गारवा
रविवारी पहाटे, सकाळी दोन वेळा पाऊसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात तापलेल्या जमिनीची भूख भागली. त्यामुळे वातावरणात सकाळी 11 वाजल्यापासून किंचित गारवा जाणवला. तर दुपारनंतर पुन्हा घामाच्या धारा वाहू लागल्या ढगाळ वातावरण आणि होणारा उष्मा यामुळे ठाणेकरांच्या हिरमुस झाला.
तर शनिवारी तापमान 40 पार होते. तर रविवारी पहाटे पडलेल्या पाऊसामुळे रविवारी दिवसभर ऊन, ढगाळ वातावरण आणि पडलेल्या सरींमुळे तापमान 35 अंश एवढे राहिले मात्र ठाणेकरांच्या घाम थांबला नाही.