MD drugs seized : मिरारोडमध्ये ३३ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

३ आरोपी अटकेत; ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
MD drugs seized
मिरारोडमध्ये ३३ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्तpudhari photo
Published on
Updated on

मिरारोड : मिरारोड आणि परिसरामध्ये अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा काशिगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण १३३.३० ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) अमली पदार्थासह ३३,४०,७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

१० जुलै रोजी दुपारच्या सुमारास काशिगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, हटकेश येथील बाबा टायर आणि कजारिया एटर्निटी वर्ल्ड शोरूमसमोरील रस्त्यावर सापळा रचण्यात आला होता. याठिकाणी संशयास्पदरीत्या आढळलेला आरोपी नदीम अब्दुल्ला खान (वय २८, रा. नयानगर, मिरारोड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे २,५८,६०० रुपये किमतीचा १२.९३ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ सापडला. तसेच त्याची ५ लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली.

MD drugs seized
AC local technical fault : कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपीकडे चौकशी केली असता, त्याला हा ड्रग्स साठा मुंब्रा येथील एका मोठ्या तस्कराने पुरवल्याचे समोर आले. गुन्हे प्रकटीकरण पथकाने अबुझार चौधरी (वय ३३, शिळफाटा, मुंब्रा पूर्व) याला मुंब्रा येथून ताब्यात घेत त्याला अटक केली.

आरोपीच्या चौकशी दरम्यान या रॅकेटचा मुख्य सूत्रधार मुंबईत असल्याचे उघड झाले. आरोपीला हा माल मंजूर मेहमुद अहमद शेख (४४, मुंबई) याने पुरवला होता. त्याला अटक केली असून त्याच्याकडे १२२.३७ ग्रॅम वजनाचा एम.डी. अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

MD drugs seized
Vaitarna pipeline damage : वैतरणा नदीचा काठ खचला, पाईपलाइन वाहून गेली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news