Mira Road Crime: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; 13 लाख 65 हजारांची फसवणूक

याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात अशोक जाधव (34) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mira Road Crime
Mira Road CrimePudhari
Published on
Updated on

मिरा रोड: लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची आणि तिची 13 लाख 65 हजार 908 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना मीरा रोड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात अशोक जाधव (34) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक जाधव याने जानेवारी 2024 पासून पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले होते. या काळात त्याने मीरा रोड येथील गेस्ट हाऊसमध्ये नेऊन महिलेशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले.

Mira Road Crime
River Rejuvenation: पंचगंगा, चंद्रभागा, मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण; 54 प्रदूषित पट्ट्यांबाबत पुनरुज्जीवन प्रकल्प राबविणार

आरोपीने केवळ शारीरिक शोषणच केले नाही, तर पीडितेकडून वेळोवेळी रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपात एकूण 13 लाख 65 हजार 908 रुपये घेतले. त्या महिलेची आर्थिक फसवणूक करून आरोपीने लग्नास स्पष्ट नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अशोक जाधव हा मुंबई महापालिकेत कामगार असून तो मिरा रोड येथे राहतो. पीडितेच्या तक्रारीवरून नयानगर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर थोरात करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news