Thane Crime : क्रिकेट प्रशिक्षकाकडून १९ वर्षीय महिला क्रिकेटपटूचा विनयभंग

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

मिरा रोड : क्रिकेट शिकवण्याच्या बहाण्याने एका १९ वर्षीय महिला क्रिकेटपटूचा वारंवार विनयभंग केल्याची घटना मिरा रोड येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मिरा रोड पोलिसांनी क्रिकेट प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विघ्नेश मेंडन , वय अंदाजे ३२ वर्षे, रा. नालासोपारा पूर्व, ता. वसई असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी क्रिकेट प्रशिक्षकाचे नाव आहे. पीडित १९ वर्षीय तरुणी ही क्रिकेट खेळाडू असून, ती आणि तिचे प्रशिक्षक विघ्नेश मेंडन हे एकाच रिक्षेने द बर्गर टाईम येथून मिरा रोड येथील मेरी गोल्ड टाकी मैदानावर जात असत.

Crime News
Crime News : जवानाला हळदीच्या मंडपातच बेड्या

या प्रवासादरम्यान आणि मैदान परिसरात आरोपी प्रशिक्षक विघ्नेश याने पीडितेच्या संमतीशिवाय तिच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून आणि अश्लील कृत्य करून तिचा वारंवार विनयभंग केला. पीडितेने या गोष्टीला विरोध केला असता, आरोपीने तिला मैदानावर इतर लोकांसमोर अश्लील शिवीगाळ करून त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासाबाबत पीडित तरुणीने प्रशिक्षक विघ्नेश मेंडन यांच्या पत्नीला आणि दुसरे प्रशिक्षक यांना माहिती दिली.

Crime News
Mira Road Traffic Police Assault: महिला वाहतूक पोलिसाला मारहाण; सरकारी कामात अडथळा प्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल

याचा राग मनात धरून आरोपी विघ्नेश याने पीडितेस धमकी दिली की, जर तू माझ्या विरोधात पोलिसात तक्रार दिली, तर मी तुझ्यामुळे माझे आयुष्य संपवून घेईन आणि या गोष्टीला तूच जबाबदार राहशील. या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने मिरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सोमवारी रात्री आरोपी विघ्नेश मेंडन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news