Mira Road News: खड्ड्यातील पाण्यात बुडून 8 वर्षीय बालकाचा मृत्यू

बिलाल वसीम सलमानी (वय-8) असे मृत बालकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे.
Mira Road News
Mira Road NewsFile Photo
Published on
Updated on

मिरा रोड - मिरा रोड रेल्वे स्थानकाबाहेर गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या एका शॉपिंग मॉलच्या बांधकामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात बुडून एका 8 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.

बिलाल वसीम सलमानी (वय-8) असे मृत बालकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे.

Mira Road News
Chilli Price: यंदा मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका!

मिरा रोड (पूर्व) स्थानकाबाहेर एका शॉपिंग मॉलचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी बांधकामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला असून, त्यात पावसाचे आणि इतर पाणी साचलेले आहे. स्थानिक शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकणारा बिलाल सलमानी हा शनिवारी दुपारी या परिसरात खेळण्यासाठी गेला होता.

दुपारी 4 वाजेपासून बिलाल बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. रात्र झाली तरी तो न सापडल्याने कुटुंबीयांचा संशय बळावला. अखेर रात्री 10 च्या सुमारास नातेवाईकांनी त्या बंद पडलेल्या मॉलच्या आवारात जाऊन पाहिले असता, पाणी साचलेल्या खड्ड्याबाहेर बिलालचे कपडे आढळून आले.

Mira Road News
Garbage Burning: महामार्गावर कचरा फेकून जाळल्याने धुराचा लोळ; प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

या मुलाचा पाण्यात शोध घेतला असता बिलालचा मृतदेह हाती लागला. या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, या मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात परिसरातील अनेक मुले पोहण्यासाठी येतात. सुरक्षा रक्षक त्यांना वारंवार हटकून बाहेर काढत असत, परंतु मुले नजर चुकवून पुन्हा त्या ठिकाणी पोहण्यासाठी शिरत होती. मात्र, इतक्या वर्षांपासून हे धोकादायक बांधकाम उघड्यावर का आहे आणि तिथे पुरेशी तटबंदी का नाही, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

घटनेची माहिती मिळताच नयानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. एका निष्पाप मुलाचा बळी गेल्याने अर्धवट राहिलेल्या बांधकामांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news