Illegal liquor seizure: मिरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी 74 लाखांची अवैध दारू, गुटखा केला नष्ट

पोलिसांनी हा मुद्देमाल बुलडोझर फिरवून नष्ट केला आहे
Mira Bhayander illegal liquor action
Mira Bhayander illegal liquor actionpudhari
Published on
Updated on

मिरा रोड: मिरा-भाईंदर शहरात अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, परिमंडळ-1 मधील विविध पोलीस ठाण्यांनी जप्त केलेला सुमारे 73 लाख 98 हजार 221 रुपये किमतीचा अवैध दारू साठा आणि प्रतिबंधित गुटखा शनिवारी भाईंदर पश्चिम येथील उत्तन कचरा प्रकल्पात नष्ट करण्यात आला.

मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा, काशिगाव, मीरा रोड, नवघर, भाईंदर, उत्तन आणि नयानगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारू यामध्ये देशी, विदेशी, हातभट्टी दारू प्रकरणी 100 गुन्हे दाखल करण्यात आले.

Mira Bhayander illegal liquor action
Thane diesel smuggling: खाद्य तेलाच्या नावाखाली अवैद्य इंधन वाहतूक

यामध्ये 4,243 लिटर देशी, विदेशी व गावठी हातभटटीची दारु एकुण 15 लाख 83 हजार रुपये किमतीची दारू आणि महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीतीत असलेला गुटखा, पान मसाला, हुक्का यामध्ये एकुण 75 गुन्हयातील जप्त केलेला 58 लाख 14 रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा मुद्देमाल असा एकूण 74 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

पोलिसांनी हा मुद्देमाल बुलडोझर फिरवून नष्ट केला आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार , ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली. जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या पंचांसमक्ष फोडून व त्यातील मद्य जमिनीत ओतून नष्ट करण्यात आले, तर प्रतिबंधित गुटख्याच्या साठ्यावर बुलडोझर फिरवून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

Mira Bhayander illegal liquor action
Barvi dam water crisis: बारवी धरण तळाला; केवळ 33 टक्के पाणीसाठा शिल्लक

सदर कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, आणि परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news