Mira Bhayandar Municipal Corporation : अखेर सत्ताधारी भाजपकडून टिपू सुलतान चौकाचे पुनर्नामकरण करण्याचा ठराव मंजूर

चौकाला टिपू सुलतान ऐवजी क्रांतिकारी अशफाकउल्ला खान यांचे नाव देण्याचा ठराव भाजपकडून मंजूर
Tipu Sultan Chowk renaming controversy
अखेर सत्ताधारी भाजपकडून टिपू सुलतान चौकाचे पुनर्नामकरण करण्याचा ठराव मंजूरpudhari photo
Published on
Updated on

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या बुधवारच्या पहिल्या महासभेत प्रशासनाने मीरारोड येथील टिपू सुलतान चौकाचे नामकरण करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. तो भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर करीत चौकाला क्रांतिकारी तथा स्वातंत्र्यसैनिक अशफाकउल्ला खान यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला. त्याला काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवित स्वतंत्र ठराव मांडला.

त्यात त्या चौकाला स्वातंत्र्यसैनिक अब्दुल गफार खान यांचे नाव देण्याची मागणी केली. तर यावेळी शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी सभागृहातून पळ काढून एकप्रकारे भाजपच्या ठरावाला पाठिंबा दिल्याचा तसेच कॉग्रेस, शिवसेना मिरा-भाईंदर विकास आघाडीच्या एकसंधावर पाणी फेरल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.

भाजप व काँग्रेसने मांडलेल्या स्वतंत्र ठरावावर मतदान घेण्याचे निर्देश महापौरांनी नगरसचिव दिनेश कानगुडे यांना दिले. त्यानुसार पार पडलेल्या मतदानाअंती भाजपच्या ठरावाच्या बाजूने 77 तर काँग्रेसच्या बाजूने 13 मते पडल्याने महापौरांनी भाजपचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आल्याचे जाहीर केले.

Tipu Sultan Chowk renaming controversy
MP Naresh Mhaske : जगभरातील शिवसैनिक राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची एकत्र येण्याची वाट बघत आहेत

तत्पूर्वी 13 डिसेंबर 2016 रोजीच्या महासभेत सत्ताधारी भाजपने मांडलेल्या ठरावात त्या चौकाला टिपू सुलतान यांचेच नाव देण्याची मागणी केली होती आणि तो ठराव भाजपनेच बहुमताने मंजूर केला होता. त्यावेळी त्या ठरावाचे सूचक विद्यमान आ. नरेंद्र मेहता तर त्यांच्या ठरावाला त्यावेळच्या भाजपच्याच नगरसेविका वर्षा भानूशाली यांनी अनुमोदन दिले होते. तर महापौरपदी गीता जैन या होत्या.

तद्नंतर 23 जून 2021 रोजीच्या महासभेत एकदा नामकरण झालेल्या वास्तूचे नाव बदलण्यात येणार नसल्याचा ठराव त्यावेळच्या सत्ताधारी भाजपकडूनच मंजूर करण्यात आल्याची आठवण विकास आघाडीचे अनिल सावंत यांनी भाजपला करून दिली. आणि त्यावेळी महापौरपदी सुद्धा विद्यमान महापौर डिंपल मेहता याच असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तर बुधवारच्या महासभेत देखील डिंपल याच महापौरपदी असताना भाजपनेच मंजूर केलेल्या ठरावाचे उल्लंघन करीत म्हैसूरचे राजे टिपू सुलतान यांचे नाव बदलण्याचा ठराव मंजूर केल्याने मिरा-भाईंदर विकास आघाडीने त्याला तीव्र विरोध दर्शविला.

भाजपने टिपू सुलतान यांचे नाव बदलण्यात तांत्रिक अडचण निर्माण होत असतानाच नव्याने सादर करण्यात येणाऱ्या नामकरण प्रस्तावाबाबत लोकप्रतिनिधी, विविध राजकीय, सामाजिक संघटना नागरीक यांचेमार्फत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाचा अभ्यास करुन महासभेपुढे प्रस्तावाची शिफारस करण्याकरीता 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार समिती गठीत करण्यात आल्याचा दावा केला.

Tipu Sultan Chowk renaming controversy
Thikpurli barfi Kolhapur : पंतप्रधान मोदींसह परदेशी पाहुण्यांनी घेतला कोल्हापुरातील ठिकपुर्लीच्या बर्फीचा स्वाद

टिपू सुलतान चौकाचे पुनर्नामकरण करून त्या चौकाला अशफाकउल्ला खान यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला. त्याला विकास आघाडीने तीव्र विरोध दर्शवित एकदा नामकरणाचा ठराव मंजूर करून त्यात बदल करण्यात येत नसल्याचा ठराव देखील मंजूर केल्यानंतर भाजपने पुनर्नामकरण करू नये, असा सल्ला दिला. त्याकडे दुर्लक्ष करीत भाजपने बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर करीत टिपू सुलतान यांच्या नावाऐवजी त्या चौकाला अशफाकउल्ला खान यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला. तर काँग्रेसने स्वतंत्र ठराव मांडून त्या चौकाला अब्दुल गफार खान यांचे नाव देण्याचा ठराव मांडला. यापैकी भाजपचा ठराव मंजूर करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news