3 March Lunar Eclipse: 3 मार्चला ग्रहणातच चंद्र उगवणार; साध्या डोळ्यांनी पाहण्याची संधी

खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांची माहिती; चंद्रग्रहणाबाबत भीती न बाळगण्याचे आवाहन
3 March Lunar Eclipse
3 March Lunar EclipsePudhari
Published on
Updated on

ठाणे : येत्या मंगळवारी 3 मार्च रोजी ग्रहणातच चंद्र उगवताना साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. चंद्रग्रहण हा एक नैसर्गिक अविष्कार आहे, तो सर्वांनी साध्या डोळ्यांनी पहायला पाहिजे.

3 March Lunar Eclipse
Abhijat Marathi Book Exhibition Mumbai: ‘अभिजात’ मराठी पुस्तक प्रदर्शनात साहित्यसंपदेचा महोत्सव; शिवचरित्रांपासून पु.लंपर्यंत वाचकांची गर्दी

जेव्हा चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेत येते तेव्हा चंद्रबिंब काळसर-लालसर रंगाचे दिसते. पृथ्वीच्या ज्या भागात चंद्र दृश्य आकाशात असतो तेथून ते चंद्रग्रहण दिसते. 3 मार्च रोजी दुपारी 3.20 वाजता चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. परंतु त्यावेळी चंद्र आपल्या दृश्य आकाशात असणार नाही.

3 March Lunar Eclipse
Marathi Language Schools: मराठी शाळांची पटसंख्या 25% वाढणार; सर्व शाळांत मराठी सक्तीची – दादा भुसे

तो पूर्व क्षितिजाखाली असेल. वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वेळी ग्रहणात चंद्र उगवताना दिसणार आहे. ग्रहण वेधकाळात धूलिवंदन करता येते.

3 March Lunar Eclipse
Marathi Content Creators: डिजिटल विश्वात मराठीची दमदार एंट्री; आशय, सातत्य आणि कौशल्यावरच लोकप्रियतेचा मंत्र

होळीचा रंगांचा सण साजरा करता येणार आहे. समाज माध्यमातून या चंद्रग्रहणाविषयी भीती दाखविली जात आहे, ती योग्य नाही. हे विज्ञानयुग आहे. शिक्षक-पालकांनी मुलांना चंद्रग्रहण दाखवून त्याविषयी माहिती द्यावी, असे आवाहनही सोमण यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news