Marathi Bhasha | डोंबिवलीकर मराठी प्रेमीला अपमानास्पद वागणूक पडली महागात

पुढारी इम्पॅक्ट : टपाल विभागातील मराठीद्वेष्ट्या कर्मचाऱ्याला बदलीची शिक्षा
डोंबिवली, ठाणे
ज्येष्ठ नागरीकाने जीपीओ पोस्ट खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होतीPudhari News Network
Published on
Updated on

डोंबिवली : बजरंग वाळुंज

मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये गेल्या महिन्यात टपाल खात्याने भरवलेल्या तिकिटांच्या प्रदर्शनाला 82 वर्षीय डोंबिवलीकर तिकीट संग्राहक रमेश पारखे दरवर्षीप्रमाणे तिकीट खरेदीसाठी गेले होते. यावेळी पारखे 32 क्रमांकाच्या खिडकीवर तिकीट खरेदीसाठी गेले असता तेथील कर्मचाऱ्याने पारखे यांना ‘तुम्ही माझ्याशी हिंदीतून बोला’, असे सांगितले. आपणास मराठी येत नाही का, असा प्रश्न पारखे यांनी करताच, संतप्त झालेल्या टपाल कर्मचाऱ्याने पारखे यांच्याशी अरेरावीची भाषा करून ‘तुम्ही माझी कुणाकडेही तक्रार करा, माझे कुणीही वाकडे करू शकणार नाही, अशीही दमदाटी केली होती. चौकशीअंती टपाल खात्याने या मराठीद्वेष्ट्या कर्मचाऱ्याला बदलीची शिक्षा दिली आहे.

या संदर्भात दैनिक पुढारीने 5 फेब्रुवारीच्या अंकात "मराठीतील संभाषणामुळे मराठी माणसाला हिणकस वागणूक : डोंबिवलीकर ज्येष्ठ नागरिकाची नाराजी" या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची टपाल खात्याने गंभीर दखल घेतली आहे.

ठाणे
तक्रारदार ज्येष्ठ नागरिक रमेश पारखेPudhari News Network

तिकीट खिडकीवरील अमराठी कर्मचाऱ्याने दिलेल्या हिणकस वागणूकीबद्दल व्यथित झालेल्या ज्येष्ठ नागरिक महासंघाचे माजी अध्यक्ष रमेश पारखे यांनी चिंता वजा संताप व्यक्त केला. मराठी भाषेत बोलल्याने आपणास महाराष्ट्रात एवढी वाईट वागणूक देण्यात येत असेल तर संबंधित टपाल कर्मचाऱ्याला मराठी भाषेचे महत्व पटवून दिलेच पाहिजे, असा विचार करून टपाल तिकीट पाहणीनंतर रमेश पारखे डोंबिवलीतील घरी परतले. त्यांनी टपाल विभागाच्या संचालकांना पत्र लिहून 32 क्रमांकाच्या खिडकीवर घडलेल्या प्रकाराची माहिती देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती.

दैनिक पुढारीने 5 फेब्रुवारीच्या अंकात "मराठीतील संभाषणामुळे मराठी माणसाला हिणकस वागणूक : डोंबिवलीकर ज्येष्ठ नागरिकाची नाराजी" या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसारित केले होते.
दैनिक पुढारीने 5 फेब्रुवारीच्या अंकात "मराठीतील संभाषणामुळे मराठी माणसाला हिणकस वागणूक : डोंबिवलीकर ज्येष्ठ नागरिकाची नाराजी" या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसारित केले होते.

याच दरम्यान दैनिक पुढारीच्या अंकातील बातमीची दखल घेऊन दिवा येथे राहणारे मराठी एकीकरण समितीचे उपाध्यक्ष आनंदा पाटील यांनी दिल्लीतील टपाल विभागाच्या महानिदेशकांना पत्र धाडले. पुढारीतील बातमीचा संदर्भ देत वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये रमेश पारखे यांच्याबाबतीत एका हिंदी भाषिक कर्मचाऱ्याने केलेल्या गैरवर्तनाची या पत्राद्वारे तक्रार करण्यात आली होती. महाराष्ट्र राजभाषा अधिनियमाने महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक आहे. ग्राहक संरक्षण अधिनियमात त्याच्या भाषेप्रमाणे त्याला सेवा मिळण्याचा अधिकार आहे. संविधानातील तरतुदीप्रमाणे हिंदी भाषेचा प्रचार केंद्र सरकार करू शकते. पण ते कोणत्याही नागरिकावर सक्ती करू शकत नाही, असे उपाध्यक्ष आनंदा पाटील यांनी तक्रारीत म्हटले होते. पाटील यांच्या तक्रारीची टपाल विभागाच्या दिल्ली कार्यालयाने घेतली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई जनरल पोस्ट कार्यालयातील तिकीट संग्रहालय विभागाच्या प्रमुखांना दिले होते. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर 32 क्रमांकावरील खिडकीवरील कर्मचाऱ्याला भाषेची अडचण होती. विषय भाषेच्या अडथळ्यामुळे उद्भवला होता. डोंबिवलीकर रमेश पारखे यांच्याशी कर्मचाऱ्याने कोणतेही गैरवर्तन केले नव्हते. पर्यवेक्षकाच्या मध्यस्थीने हा विषय मिटवण्यात आला होता. कर्मचारी हिंदी भाषक असल्याने हा प्रकार घडला. तरीही तक्रारीची गंभीर दखल घेऊन संबंधित टपाल सहाय्यक कर्मचाऱ्याची तिकीट संग्रहालयातून अन्य विभागात बदली करण्यात आल्याचे मुंबई जनरल टपाल विभागातील तिकीट संग्रहालय विभागाचे उपनिदेशक राजन बुचडे यांनी मराठी एकीकरण समितीचे उपाध्यक्ष आनंदा पाटील यांंना कळविले आहे.

डोंबिवली, ठाणे
Marathi Bhasha | मराठी भाषेचा होतोय घोर अपमान; ज्येष्ठ नागरीकाने व्यक्त केली खंत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news