Kalyan-Shil Traffic : कल्याण-शिळ रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी

खड्डे, अरुंद रस्ते, अपूर्ण पूल कोंडीस कारणीभूत
Kalyan-Shil Traffic News
Kalyan-Shil Traffic : कल्याण-शिळ रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडीFile Photo
Published on
Updated on

Major traffic jam on Kalyan-Shil road

नेवाळी : पुढारी वृत्तसेवा

कल्याण शिळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत असून रविवारी सकाळपासून या मार्गावर वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Kalyan-Shil Traffic News
Kalyan Crime News : कल्याण पूर्वेत १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

हे नित्याचे चित्र असून पलावा जंक्शन ते मानपाडा जंक्शनपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे. सकाळ संध्याकाळ या परिसरात निर्माण होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णवाहिका देखील तासन्तास ताटकळत अडकून राहत असल्याने नागरिकांकडून सत्ताधार्‍यांविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र कोंडीमुक्त मार्गासाठी कोणत्याही उपायोजना दिसून येत नाहीत.

Kalyan-Shil Traffic News
Brimstowad Project : ‘ब्रिमस्टोवॅड’वर कोट्यवधी खर्चूनही मुंबईची होतेय तुंबई

कल्याण शिळ रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढल्याने वाहनचालक हैराण आहेत. कामावर जाताना लेटमार्क घरी येताना उशीर यामुळे वाहनचालकांचा प्रवास त्रासदायक झाला आहे. त्यातच मेट्रो 12च्या कामासाठी जागोजागी कल्याण शिळ रस्त्यावरील दोन लेन ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे सतत मानपाडा, सोनारपाडा, दावडी नाका या परिसरात सर्वाधिक कोंडी होते. ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरू असतात. मात्र वाढती वाहन संख्या, अरुंद रस्ता याचा फटका सर्वसामान्य वाहनचालकांना बसू लागला आहे.

कोंडीमुक्त प्रवासाची अपेक्षा धूसर

कल्याण शिळ रस्त्यावर सुरू असलेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकांचा प्रमाण अधिक आहे. रुग्णवाहिकेतून रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाताना महाबलाढ्य वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. मात्र कोंडी मुक्त मार्गासाठी कोणत्याही उपायोजना दिसून येत नसल्याने या रस्त्यावरील कोंडीमुक्त प्रवासाची अपेक्षा मात्र धूसर झालेली आहे.

खड्ड्यांमुळे वाहतूक धीम्या गतीने!

कल्याण शिळ रस्त्यावरील माणगाव जवळ खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आधीच कोंडी त्यात खड्ड्यांची भरती त्यामुळे वाहतूक सतत धीम्या गतीने सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news