

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीच्या दुसऱ्या मळ्यावरील कार्यालयाच्या एसी इनडोअर युनिटला आग लागण्याची घटना बुधवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. ही आग किरकोळ स्वरूपाची होती.
बुधवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास ठाणे पालिकेच्या माजीवाडा- मानपाडा प्रभाग समिती बाळकुम अग्निशमन केंद्र जवळ, यशस्वी नगर, बाळकुम नाका, ठाणे (प.)येथील दुसऱ्या माळ्यावर असलेल्या पाणी पुरवठा विभागामधील एसीच्या इनडोअर युनिटला किरकोळ आग लागली होती.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत एसी इनडोअर युनिट जळाला असून इतर कोणतेही नुकसान झालेले नाही. अथवा कुणालाही इजा झाली नसल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.