MHADA chairman appointment : किसन कथोरे यांना म्हाडाची जबाबदारी मिळणार?

सिडको भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता; प्रशांत ठाकूर यांच्या नावाची चर्चा
MHADA chairman appointment
MHADA chairman appointmentpudhari photo
Published on
Updated on

ठाणे : राज्यातील महायुती सरकारमधील विविध महामंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा रखडलेला तिढा आता सुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महामंडळांच्या वाटपाबाबत झालेल्या चर्चेनंतर आता अंतिम निर्णयाच्या दिशेने हालचाली सुरू असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाची जबाबदारी भाजपचे मुरबाडचे आमदार किसान कथोरे यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

महायुतीतील महामंडळ वाटपाबाबत उपलब्ध माहितीनुसार भाजपला ४८, शिंदे यांच्या शिवसेनेला २९ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २२ महामंडळे मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या नियुक्त्या सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर आले आहे. किसन कथोरे हे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार असून त्यांना विधिमंडळ कामकाजाचा आणि मतदारसंघातील संघटनात्मक राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

MHADA chairman appointment
Thane FDA action: पान शॉपवर नौपाड्यात एफडीए पथकाची छापेमारी

त्यांच्या नावाची चर्चा यापूर्वीही मंत्रिपदासाठी झाली होती. विशेष म्हणजे फेब्रुवारी २०२५ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक कार्यक्रमात कथोरे हे मंत्रिपदासाठी पात्र असून योग्य वेळी त्यांना संधी मिळेल, असे संकेत दिले होते. यामुळे आता महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये कथोरे यांच्या नावाला प्राधान्य मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, किसन कथोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच झालेली भेटही या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर कथोरे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कथोरे हे फडणवीस यांच्या विश्वासातील नेत्यांपैकी एक मानले जात असल्याने त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो, अशीही चर्चा आहे. मात्र या भेटीचा नेमका विषय अथवा कोणत्या पदाबाबत चर्चा झाली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. महामंडळांच्या महत्त्वाच्या पदांसाठी भाजपसह शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक इच्छुक गेल्या काही काळापासून प्रयत्नशील होते.

MHADA chairman appointment
Marathi films prime time shows : मराठी चित्रपटांचा प्राईम शोसाठी संघर्ष सुरूच

आता वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याने अनेक इच्छुकांचे मनसुबे उधळण्याची शक्यता आहे. विशेषतः म्हाडा आणि सिडको यासारख्या महत्त्वाच्या संस्थांवर कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news