‌Ration shop rice : ‘प्लास्टिक तांदळा‌’ची चर्चा; प्रत्यक्षात तो ‘फोर्टिफाईड तांदूळ‌’!

कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राबवली जाणार जनजागृती मोहीम; 2 कोटी 12 लाखांचा निधी मंजूर
Fortified rice clarification
‌‘प्लास्टिक तांदळा‌’ची चर्चा; प्रत्यक्षात तो ‘फोर्टिफाईड तांदूळ‌’!pudhatri photo
Published on
Updated on

ठाणे : राज्यात रेशन दुकानांतून मिळणाऱ्या तांदळाबाबत ‌‘प्लास्टिकचा तांदूळ‌’ मिळतो आहे, अशी अफवा समाजमाध्यमांवर जोर धरत आहे. काही ठिकाणी तांदूळ शिजत नसल्याच्या आणि पाण्यावर तरंगत असल्याच्या व्हीडिओंनी जनतेत गोंधळ निर्माण केला आहे. मात्र, हा तांदूळ प्लास्टिकचा नव्हे, तर शासनाच्या कुपोषणमुक्ती अभियानांतर्गत दिला जाणारा फोर्टिफाईड तांदूळ असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

फोर्टिफाईड तांदूळ म्हणजे असा तांदूळ ज्यात लोह, फॉलिक ॲसिड आणि जीवनसत्त्व 12 सारखी पोषक तत्वे मिसळलेली असतात. हा तांदूळ शरीरातील सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता भरून काढतो तसेच ॲनिमिया आणि ॲमेनियावर मात करण्यास मदत करतो. सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे तो राज्यातील रेशन दुकानदारांकडून लाभार्थ्यांना वितरित केला जातो. तांदळाच्या पिठापासून ‌‘एक्सट्रूझन‌’ या तंत्रज्ञानाद्वारे फोर्टिफाईड राईस कर्नल्स तयार केले जातात आणि ते नियमित तांदळात मिसळून दिले जातात. त्यामुळे हा तांदूळ शिजण्यात, दिसण्यात किंवा चवीत थोडासा वेगळा वाटू शकतो.

Fortified rice clarification
Thane Municipal Election : आरक्षण सोडतीत ठाण्यातील दिग्गजांना फटका...

सरकारने या तांदळाबाबत पसरत असलेल्या अफवांना आळा घालण्यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना फोर्टिफाईड तांदळाचे वास्तविक पोषणमूल्य आणि आरोग्य फायदे समजावून देण्यासाठी 2 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पोस्टर, व्हीडिओ, सोशल मीडिया मोहीम, ग्रामसभा आणि शाळांमधील कार्यक्रमांच्या माध्यमातून ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

काय आहे फोर्टिफाईड तांदूळ?

फोर्टिफाईड तांदूळ म्हणजे असा तांदूळ ज्यात शरीराला आवश्यक असलेली अतिरिक्त पोषक तत्वे मिसळली जातात. यात लोह, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन 12, व्हिटॅमिन आणि झिंक यांचा समावेश असतो. हा तांदूळ नियमित तांदळापेक्षा अधिक पौष्टिक असून, कुपोषण आणि सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरतो. विशेषतः अशक्तपणा (ॲनिमिया) आणि गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या आरोग्य समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फोर्टिफाईड तांदूळ उपायकारक आहे.

Fortified rice clarification
Navi Mumbai News : दिवाळे गावातील शाळांच्या परिसरातच रंगताहेत दारूच्या पार्ट्या

जनजागृती मोहीम लवकरच

राज्यात लवकरच फोर्टिफाईड तांदळाबाबत जनजागृती मोहीम सुरू होणार आहे. नागरिकांना या तांदळाचे फायदे आणि त्यातील पोषक तत्वांविषयी योग्य माहिती मिळावी म्हणून रेशनिंग दुकानांवर माहितीपत्रके लावली जाणार आहेत. तसेच ग्रामसभांमध्ये आणि शाळांमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम घेतले जातील. या मोहिमेसाठी 2 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, सोशल मीडियावरही या विषयावर व्यापक प्रमाणात प्रचार करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news