Thane Crime: सिमेंटच्या गोण्यांच्या आड मद्यतस्करी; दीड कोटीचे मद्य जप्त

तस्करांच्या नव्या फंड्याचा पर्दाफाश
Thane Crime
Thane CrimePudhari
Published on
Updated on

ठाणे: मद्याची तस्करी करणाऱ्या मद्य तस्करांनी दहा चाकी ट्रकमध्ये सिमेंटच्या गोण्याखाली कप्प्यांमध्ये दीड कोट्याचे बनावट मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवून मद्य तस्करांना धक्काच दिला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ट्रकची तपासणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. या कप्प्यांमध्ये तब्बल 1 कोटी 45 लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्याची धडक कारवाई केली. या प्रकरणी पथकाने दोघांना बेड्या ठोकल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी दिली.

Thane Crime
Uran Environmental Damage: गोदांमासाठी निसर्गाचा घात; खारफुटीची कत्तल

नवी मुंबई, बेलापूर-ठाणे रोडवरील डी. वाय. पाटील स्टेडियमजवळ 24 एप्रिल 2026 रोजी गस्त घालत असताना ठाणे 1च्या भरारी पथक क्र. 1 ने संशयित दहाचाकी ट्रक थांबवून तपासणी केली. ट्रकमध्ये सिमेंटच्या गोण्या आढळल्या.

त्या बाजूला केल्यानंतर खाली बनवलेल्या गुप्त कप्प्यांमध्ये पुठ्ठ्याचे बॉक्स सापडले. बॉक्स उघडून पाहिल्यावर त्यामध्ये गोवा राज्यात निर्मित व मध्यप्रदेशात विक्रीसाठी असलेल्या ‌‘रॉयल सिलेक्ट डिलक्स व्हिस्की‌’च्या 180 मिलीच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत ‌‘रॉयल सिलेक्ट डिलक्स व्हिस्की‌’च्या 180 मिलीच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत एकूण 1 हजार 265 बॉक्स (10 हजार 929 लिटर) विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दारूबंदी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Thane Crime
Raigad landslide prone villages: रायगडमधील 225 दरडप्रवण गावांना हायटेक सुरक्षा

विदेशी मद्य आणि ट्रकसह एकूण किंमत 1 कोटी 45 लाख 23 हजार 950 रुपये इतक्या रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी वाहनचालक दिनेश कैलास नाथ आणि अनिल कुमार श्यामलाल नायक यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार आणि अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम. पी. धनशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news