Konkan Heavy Rain Alert : पश्‍चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

२६ ऑक्टोबरपासून कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता
Konkan Heavy Rain Alert
Konkan Heavy Rain Alertpudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकण किनारपट्टीवरही मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. २६ ऑक्टोबरपासून या भागात पाऊस येण्‍याची शक्यता आहे. त्यामुळे सध्‍या सुरू असलेल्या भातकापणीवर याचा मोठा परिणाम होणार आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्‍याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे तामीळनाडूसह गोवा आणि महाराष्‍ट्राच्या किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस येण्‍याची शक्यता हवामान विभागाने दिलेल्या अंदाजामध्‍ये कोकण किनारपट्टीवरही या वादळाचा मोठा परिणाम संभवत आहे.

Konkan Heavy Rain Alert
India inflation rate|महागाईचा भडका, दर ५.५४ टक्क्यांवर! खर्चाचे गणित बिघडले, शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात महागाई अधिक

बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचे पुढे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. दरम्यान, तामिळनाडूमध्ये २६ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीसाठी मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशाराही देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आणि लगतच्या पूर्व-मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. ही हवामान प्रणाली अधिक तीव्र होऊन पश्चिम आणि नैऋत्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

पुढील काळात तिचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, संभाव्य चक्रीवादळाचा तामिळनाडूवर थेट परिणाम होण्याची शक्यता नाही. दरम्यान, तामिळनाडूमध्ये ईशान्य मोसमी पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील तीन जिल्ह्यांत अतिवृष्टी, तर १३ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. चेन्नईतील एमजीआर नगर येथे सर्वाधिक १५.४ सेंटीमीटर पाऊस झाला.

Konkan Heavy Rain Alert
Matsyodari Devi : श्री मत्स्योदरी देवीच्या दानपेटीत ७ लाख ६३ हजार ६९० रुपयांचे दान

दक्षिण बंगालचा उपसागर आणि दक्षिण तामिळनाडूच्या लगतच्या भागात यापूर्वीच कमी दाबाचे आणखी एक क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र फार तीव्र होण्याची शक्यता नसली, तरी त्याच्या प्रभावामुळे दक्षिणेकडील जिल्ह्यांत अतिवृष्टी होऊ शकते. राज्याच्या अन्य भागांतही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

गुरुवारी तिरुनेलवेली, थुथुकुडी, कन्याकुमारी, तेनकासी, विरुधुनगर, रामनाथपुरम, थेनी, डिंडीगुल आणि मदुराई या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोईम्बतूर, निलगिरी, शिवगंगा, पुदुकोट्टई, तंजावूर, तिरुवरूर, नागपट्टिनम आणि मयिलादुथुराई येथेही पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी कन्याकुमारी, कोईम्बतूर आणि निलगिरी जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इरोड, सेलम, नमक्कल, करूर, तिरुची आणि थेनी जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा फटका बसू शकतो.

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस

चेन्नईमध्ये २२ आणि २४ ऑक्टोबरला मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर २५ ऑक्टोबरला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये २६ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टी, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह खराब हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नोव्हेंबरमध्ये तामिळनाडूमध्ये ईशान्य मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहू शकते. हा पाऊस जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news