Matsyodari Devi : श्री मत्स्योदरी देवीच्या दानपेटीत ७ लाख ६३ हजार ६९० रुपयांचे दान

शारदीय नवरात्र महोत्सवातील दानाची मोजणी; मौल्यवान वस्तूही अर्पण
Matsyodari Devi
Matsyodari Devi : श्री मत्स्योदरी देवीच्या दानपेटीत ७ लाख ६३ हजार ६९० रुपयांचे दानfile photo
Published on: 
Updated on: 

Donation of Rs. 7 lakh 63 thousand 690 in the donation box of Shri Matsyodari Devi

अंबड पुढारी वृत्तसेवा : येथील श्री मत्स्योदरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ दरम्यान घटस्थापनेपासून ते गुरुवार, दि. २२ ऑक्टोबरपर्यंत भाविकांनी देवीच्या दानपेटीत अर्पण केलेल्या रकमेची मोजणी करण्यात आली. एकूण ७ लाख ६३ हजार ६९० रुपये प्राप्त झाले. याशिवाय भाविकांनी देवीच्या चरणी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूही दानपेटीतून मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, राज्यासह अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही दरवर्षीच्या तुलनेत देवीच्या दानाच्या रकमेत कोणतीही घट झाली नसल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

Matsyodari Devi
Jalna Drought : दुष्काळात उभ्या पिकांना शेतकऱ्यांचे भावनिक आलिंगन

संस्थांन चे अध्यक्ष तथा तहसीलदार सोमेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थांचे सचिव तथा नायब तहसीलदार एकनाथ भोजने, विश्वस्त आणि पुजारी गीता विलास कुंटेफळकर यांच्या उपस्थितीत दानपेटी उघडण्यात आली. घटस्थापनेपासून संपूर्ण शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत भाविकांनी दानपेटीत अर्पण केलेल्या रकमेचा या मोजणीत समावेश आहे. दानपेटीत जमा झालेल्या नोटांच्या मोजणीतून ७ लाख १३ हजार ८२५ रुपये प्राप्त झाले, तर विविध मूल्यांच्या नाण्यांमधून ४९ हजार ८६५ रुपये मिळाले. अशा प्रकारे नोटा आणि नाण्यांची एकूण रक्कम ७ लाख ६३ हजार ६९० रुपये झाली. यामध्ये ५००, २००, १००, ५०, २०, १० आणि ५ रुपयांच्या नोटांचा समावेश होता.

तसेच २०, १०, ५, २ आणि १ रुपयांच्या नाण्यांची मोजणी करण्यात आली. यंदा राज्यातील विविध भागांसह जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही श्री मत्स्योदरी देवीवरील भाविकांची श्रद्धा कायम असल्याचे दानपेटीतील रकमेतून दिसून आले आहे. दरवर्षी नवरात्र महोत्सवात दानपेटीत जेवढ्या प्रमाणात रक्कम जमा होते, तेवढीच रक्कम यंदाही भाविकांनी अर्पण केली आहे.

Matsyodari Devi
Jalna News: जमीन दिली, आता रोजगार मिळेना; टाटा सोलार प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

रोख रकमेबरोबरच भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूही दानपेटीतून प्राप्त झाल्या. यामध्ये २७ डोळे, एक घोडा, पाच ठोकळे, तीन जोडवे आणि एक चांदीची अंगठी यांचा समावेश आहे. नवरात्र महोत्सवादरम्यान भाविकांकडून देवीच्या चरणी रोख रक्कम तसेच विविध वस्तू अर्पण केल्या जातात.

यंदाही भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दान अर्पण केल्याचे या मोजणीतून स्पष्ट झाले आहे. यावेळी व्यवस्थापक कैलास शिंदे, दिवाकर जोगळादेवीकर, एकनाथ महाराज खवल, अरुण भवर, अंबादास भवर, शिवाजी लांडे, विजय जाधव, महेंद्र पटेकर, महेंद्र खरात, दिगंबर खरात, दळवे दाजी, सत्यभान खरात, नामदेव राठोड आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news