

ठाणे: गेल्या दहा वर्षात कोकण किनारपट्टीवर दहा चक्रिवादळे आदळली. यामध्ये तोक्ते, फयान, निसर्गसह अनेक वादळांचा यात समावेश आहे. यावर्षी मे महिन्यातच अरबी समुद्रात मान्सुनपूर्व पहिली प्रणाली निर्माण होण्याचे संकेत असल्याचे वादळाचे ढग आजही कोकण किनारपट्टीवर आहेत.
केरळजवळ अशी वादळे निर्माण होण्याची शक्यता आहे. वादळ म्हणजे वातावरणातील हवेच्या दबावातील फरकामुळे निर्माण होणारेे जोरदार वारे. वादळ म्हणजे वातावरणातील हवेच्या दाबामुळे निर्माण होणारे जोरदार वारे असा आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणी तापमान वाढते तेव्हा तेथील हवा हलकी होऊन वर जाते. तिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. हा दाब भरून काढण्यासाठी सभोवतालची हवा वेगाने तिथे येते. ज्यातून वादळाची निर्मिती येते.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 2009 मध्ये फयान आणि 2020 मध्ये निसर्ग, 2021 मध्ये तोक्ते यासारखी मोठी वादळे आली होती. यावर्षीही अशा प्रकारचे वादळ किनारपट्टीवर निर्माण होऊ शकते, असे हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे. केरळमध्ये तयार होणाऱ्या तीव्रतेचा अंदाज आल्यानंतर त्याचे परिणाम सांगता येऊ शकतात, असे अभ्यासकांचे मत आहे. मात्र महाराष्ट्रावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असेही काही जाणकारांचे मत आहे.
देशात चक्रिवादळाचे मान्सुनपूर्व म्हणजे मार्च ते मे आणि मान्सुन पश्चात म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर असे दोन मौसम तयार होतात. त्यामुळे चक्रिवादळाची शक्यता याच काळामध्ये असलेली दिसून येते.
चक्रिवादळ विशेषत: जूनच्या सुरुवातीला आल्याचा इतिहास आहे. अरबी समुद्रापेक्षा बंगालच्या उपसागरात चक्रिवादळाची संख्या आतापर्यंत अधिक आहे. मात्र, अरबी समुद्रही याला आता अपवाद राहिलेला नाही. 10 मे पर्यंत अरबी समुद्रात केरळजवळ एक प्रणाली निर्माण होऊ शकते.
म्हणजे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळसदृश स्थिती निर्माण होईल आणि या काळात पाऊस बरसण्याची शक्यता आहे, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. खासगी हवामान तज्ज्ञ संस्था, क्लायमेटनेही याबाबतचा अंदाज दिला आहे. 10 ते 14 या काळात अशा कमी दाबाच्या पट्ट्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे मे महिन्यातच कोकणातच पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
आतापर्यंतची कोकण किनारपट्टीवरील चक्रीवादळे
निसर्ग चक्रीवादळ (जून 2020) - हे वादळ कोकण किनारपट्टीसाठी अत्यंत विनाशकारी ठरले. अलिबागजवळ जमिनीवर धडकलेल्या या वादळाने कोकण प्रांतावर मोठे घाव घातले होते. तौक्ते चक्रीवादळ - मे 2021, या वादळाचाही कोकण किनारपट्टीला मोठा तडाखा बसला, ज्यामुळे अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्था आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. फयान चक्रीवादळ दशकभरापूर्वी, निसर्ग वादळाच्या आधीच्या काळात फयान चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवर परिणाम केला होता.
शास्त्रज्ञांच्या मते, अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची वारंवारता 46 टक्क्यांनी वाढली आहे. हवामान बदलातील तापमान वाढीमुळे पश्चिम किनारपट्टीच्या पातळीत 1.8 मीटरपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खारफुटीचे संरक्षण पाहता निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळांच्या वेळी किनारपट्टीवरील खारफुटीमुळे वादळाचा तडाखा काही प्रमाणात कमी बसला होता.
या वादळांमुळे कोकणातील आंबा, काजू आणि नारळ-सुपारीच्या बागांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोकण किनारपट्टीवरील आदळलेल्या तीन मोठ्या वादळांमुळे आंबा, नारळ, सुपारी बागायतींचे मोठे नुकसान झाले होते. मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडल्याने वर्षानुवर्ष उत्पन्न देणारी शेतकऱ्यांची झाडे नष्ट झाली. त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामेोरे जावे लागले. शासनाकडूनही याची भरीव मदत मिळाली नाही