Mhasla Nagar Panchayat election: म्हसळा नगराध्यक्षपदाची आज निवडणूक; सत्तासंघर्षात कोण मारणार बाजी ?

नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून शाहिद जंजिरकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील शेडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Mhasla Nagar Panchayat election
Mhasla Nagar Panchayat electionPudhari
Published on
Updated on

म्हसळा शहर: म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक गुरुवारी ( 7 मे) दुपारी 12 वाजता विशेष सभेत पार पडणार असून या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. संख्याबळाच्या जोरावर शिवसेना शिंदे गट आपला नगराध्यक्ष बसवणार की सुनील तटकरे यांच्या रणनीतीने राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुपारी 12.05 वाजल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर 12.10 वाजता मतदान प्रक्रिया होऊन तत्काळ निकाल घोषित केला जाणार आहे.नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर म्हसळा नगरपंचायतीत राजकीय समीकरणे अत्यंत चुरशीची बनली आहेत. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून शाहिद जंजिरकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील शेडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Mhasla Nagar Panchayat election
Illegal soil excavation Uran: उरणमध्ये रात्रीच्या वेळी मातीचोरीला पेव

राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना सुनील शेडगे यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हीप जारी केला आहे. दोन दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बंडखोर नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप मोडल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला असून सध्याच्या घडीला नगरपंचायतीत शिवसेनेकडे 10 नगरसेवकांचे संख्याबळ आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 6 नगरसेवक आहेत.

Mhasla Nagar Panchayat election
Lokshahi Din: रायगडातील लोकशाही दिन, प्रशासन 'दीन'; फक्त एक तक्रार अर्ज, बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी

या पार्श्वभूमीवर म्हसळा नगरपंचायतीतील आजचा निकाल आगामी स्थानिक राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे.

शिवसेना- राष्ट्रवादीत संघर्ष

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधील विकोपाला गेलेला सत्ता संघर्ष थांबला असून आजच्या निकालाने राजकीय संघर्ष थांबणार की पुढे चालू राहणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news