

ठाणे : मुंबईसह कोकणातील एकुण 9 महापालिकांमध्ये दुरंगी आणि तिरंगी लढती होत आहेत. मुंबई, ठाणे, भिवंडी, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, वसई-विरार येथे तिरंगी तर पनवेल, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर येथे दुरंगी लढती होत आहे. शेवटच्या दिवशी तब्बल विरोधकांचे 40 उमेदवार रिंगणातून बाहेर गेल्याने महायुतीला या जागांवर एकतर्फी विजय मिळाला आहे. दरम्यान, विरोधकांनी माघारीमागे घोडेबाजार असल्याचा आरोप केला आहे.
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कल्याण डोंबिवलीत तब्बल 20 जणांनी अर्ज माघारी घेतल्याने सत्तारूढ भाजप शिवसेनेचे 20 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या महापालिकेत आता केवळ 102 जागांसाठी निवडणूक होणार आहे. बिनविरोध आलेल्यांमध्ये भाजपचे 14 आणि शिवसेनेचे 6 नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेत तब्बल 7 नगरसेवक बिनविरोध आले आहेत. विरोधकांच्या उमेदवारांनी काही ठिकाणी माघार घेतली तर काहींचे अर्ज बाद झाले, त्यामुळे ही स्थिती उद्भवली. भिवंडी 6 आणि पनवेलमध्ये 7 असे एकूण 40 नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. यासर्व महापालिकामिळून 928 जागांसाठी निवडणूक असून प्रमुख पक्षांचे 3 हजारपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत.
कालच निवडणूक आयोगाने बिनविरोध प्रकरणांची चौकशी होणार असल्याचे सांगितले होते, मात्र दुसऱ्या दिवशी बिनविरोधचा आकडा दुपटीवर गेला. विशेष म्हणजे 22 लाडक्या बहिणी नगरसेविका आहेत. उबाठा, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले