किसन कथोरे-पनवेलकर राजकीय वाद पुन्हा पेटला; सुपारीच्या आरोपाने खळबळ, नेमकं काय घडलं?

बदलापूर येथील एका जमिनीच्या वादातून आमदार किसन कथोरे आणि उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्यात टोकाचे वाद झाले होते. दरम्यान मागील वर्षी पनवेलकर यांच्या अंबरनाथ येथील घरावर गोळीबार करण्यात आला होता.
Ambernath News
Ambernath NewsPudhari
Published on
Updated on

अंबरनाथ: भाजपा आमदार किसन कथोरे आणि उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. किसन कथोरे यांनी विश्वनाथ पनवेलकर यांची हत्या करण्यासाठी आपल्याला सुपारीची ऑफर केली असल्याचे गँगस्टर इजाज लकडावाला यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिलेल्या एका पत्रात म्हटले आहे.

बदलापूर येथील एका जमिनीच्या वादातून आमदार किसन कथोरे आणि उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्यात टोकाचे वाद झाले होते. दरम्यान मागील वर्षी पनवेलकर यांच्या अंबरनाथ येथील घरावर गोळीबार करण्यात आला होता.

Ambernath News
Panvel Uran land conflict: उरण-पनवेल पट्ट्यात एमएमआरडीए प्रकल्पांवरुन संघर्ष; भूसंपादनाचा मुद्दा ठरतोय कळीचा

त्यावेळी देखील या गोळीबारामागे किसन कथोरे यांचा हात असल्याचा आरोप पनवेलकर यांनी केला होता. यावेळी किसन कथोरे यांनी 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला होता. दरम्यान किसन कथोरे यांच्यामार्फत उद्योजक पनवेलकर यांना ठार मारण्याची सुपारीसाठी कथोरे यांच्या नजीकचे लोक मुंबई न्यायालयात भेटले होते. असे लकडावाला याने दिलेल्या पत्रात म्हंटले असल्याचे सांगण्यात येते.

यासंदर्भात उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांनी पत्रकार परिषद घेऊन किसन कथोरे यांच्या पासून आपल्या जीवाला धोका आहे. त्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. मात्र आपल्याला कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर कथोरे यांनी विश्वनाथ पनवेलकर हा स्वतः गुंड आणि खदान माफिया आहे. तसेच एजाज लकडावाला याचे आपण नावही ऐकले नसून त्याच्याशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news