Khatik Community Protest | निर्णय मागे न घेतल्यास मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मटणाचे दुकान उघडणार...

खाटीक समाज संस्थेचा केडीएमसीला इशारा
Khatik Community Protest
Khatik Community Protest KDMC(Pudhari File Photo)
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने येत्या शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी महापालिका हद्दीतील चिकन मटण, मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मटणाचे दुकान सुरू करून निषेध करण्यात येईल, असा इशारा हिंदु खाटिक समाज संस्थेचे अध्यक्ष शिरीष लासुरे यांनी दिला आहे.

कत्तलखान्यांसह मटण, चिकन, मांस विक्रीची दुकाने स्वातंत्र्यदिनी बंद ठेवण्याच्या केडीएमसीच्या निर्णयावर विविध स्तरातून टीका झाल्यानंतर कल्याण-डोंबिवलीतील मटण, मांस विक्रेते आक्रमक झाले आहेत. रिपब्लिकन पक्ष आठवले गटाने यासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला आहे. कत्तलखाने आणि मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश प्राप्त झाल्यानंतर विक्रेते आणि व्यावसायिकांनी शांततेची भूमिका घेतली. या निर्णयाच्या विरोधात आवाज उठविल्यास प्रशासनाकडून त्रास दिला जाईल, अशी भीती या व्यवसायिकांना वाटत होती. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या निर्णयाबद्दल आक्रमक भूमिका घेतल्याने मटण/मांस विक्रेते देखिल आक्रमक झाले आहेत.

Khatik Community Protest
Dombivali News | डोंबिवलीतील पोस्ट- पासपोर्ट ऑफिस समोरचा सिमेंट काँक्रिट रोड तोडला

हिंदू खाटिक समाज संस्थेचे अध्यक्ष शिरीष लासुरे यांनी केडीएमसीला पत्र देऊन बंदचा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. मांस/मटण विक्री करणारा वर्ग सामान्य आहे. बहुतांशी विक्रेते आणि व्यावसायिकांची यावर उपजीविका अवलंबून आहे. अशाप्रकारे एक दिवस मांस/मटण विक्रीचा व्यवहार बंद ठेऊन केडीएमसी प्रशासन आपल्या हद्दीतील मांस-मटण व्यवसायिकांवर अन्याय करत आहे. राज्यात २७ महापालिकांपैकी अशाप्रकारचा निर्णय कुणीही घेतलेला नाही. असे असताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाच अशा प्रकारचा निर्णय का घेत आहे ? जुन्या शासन निर्णयाचा आधार घेऊन आदेश काढण्याचा आदेश दिला कुणी ? असा सवाल हिंदू खाटिक समाज संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष लासुरे यांनी उपस्थित केला आहे.

Khatik Community Protest
Dombivali Boiler Blast Case | डोबिंवली स्फोट प्रकरणातील कंपनी मालक मालती मेहता नाशिकमधून ताब्यात

असले निर्णय घेण्यापेक्षा रस्ते सुधारावेत

अशाप्रकारचा निर्णय घेण्यापेक्षा कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची झालेली दुरवस्था सुधारावी. कल्याण रेल्वे स्थानक भागातील वाहतूक कोंडीमुळे सारेच हैराण आहेत. अशा महत्वाच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी मेहनत घ्यावी. तेथे चांगले काम करावे. कत्तलखाने आणि मांस/मटण विक्रीची दुकाने स्वातंत्र्यदिनी बंद ठेऊन प्रशासनाला काय मिळणार आहे ? त्यामुळे हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मटण विक्रीचे दुकान सुरू करून प्रशासनाचा खाटिक समाजातर्फे निषेध केला जाईल, असा इशारा अध्यक्ष लासुरे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news