KDMC standing committee meeting: केडीएमसीच्या पहिल्याच स्थायी समितीच्या सभेत भाजपा आक्रमक

आरोग्य विभागातील साहित्य खरेदी प्रकरणी अपुरी माहिती सादर केल्याने धरले धारेवर
KDMC
KDMC Pudhari
Published on
Updated on

कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या साडेपाच वर्षानंतर पार पडलेल्या स्थायी समितीच्या पहिल्याच सभेच्या विषय पाटला वरील 35 विषयांपैकी अर्धे विषय सभेत भाजपाने आक्रमक भूमिका घेत स्थगित ठेवल्याने प्रशासनावर नामुष्की ओढवली होती.

आरोग्य विभागाचे आरोग्य साहित्य खरेदीचे मंजुरीसाठी सादर केलेले तब्बल 14 विषया संदर्भात प्रशासनाने अपुरी माहिती सादर केल्याने चांगलेच धारेवर धरल्याने प्रशासनाने पुरेशी माहिती घेऊन हे विषय समितीसमोर आणावेत असे आदेश सभापती मल्लेश शेट्टी यांनी प्रशासनाला दिले आहेत.

KDMC
Politics News: शिवसेनेत विलीन करा ‌‘प्रहार जनशक्ती‌’ पक्ष; आमदारकीच्या मोबदल्यात शिंदेंच्या नेत्यांची बच्चू कडूंसमोर अट

तब्बल साडे पाच वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर निवडणूक पार पडल्यावर लोकप्रतिनिधी राजवटीतील स्थायी सभापती निवडी नंतरच्या शुक्रवारी पार पडलेल्या पहिल्या स्थायी समितीच्या सभेत विविध 35 विषयाचे प्रस्ताव विषय पटला ठेवण्यात आले होते.

सभेमध्ये आरोग्य विभागाचे आरोग्याशी निगडित असलेले आरोग्य साहित्य खरेदीचे 14 विषय सभेच्या विषयपत्रिके द्वारे पटलावर सादर केले. सभेच्या सुरुवाती पासूनच भाजपाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या विषयांना मंजूरीसाठी सभेत मांडताच भाजप सदस्य दीपेश म्हात्रे आणि मंदार हळबे यांनी या विषयावर प्रसासनाला माहिती सादर करण्यास सांगितले.

कोणत्या गोळ्या आहेत. त्याची बाजारात किती किंमत आहे. साहित्याची किती किंमत आहे. साहित्य प्रकारानुसार त्यांचे दर सादर करावेत. आरोग्य खात्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्यासह मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ल यांनी सांगितले की, साहित्य प्रकारा नुसार त्यांच्याकडे दर नाही.

त्यांची माहिती घेऊन सगळा विषय पुढच्या सभेत नव्याने मंजूरीसाठी आणला जाईल. मात्र सध्या पुरेसा औषधसाठा महापालिकेच्या आरोग्य खात्याकडे आहे की नाही? याचीही विचारणा सदस्य म्हात्रे आणि हळबे यांनी केली. त्यावर पुरेसा अत्यावश्यक औषधसाठा आहे. त्यामुळे हा विषय स्थगित ठेवल्याने फारसा फरक पडणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

अत्यावश्यक वेळेला 2 लाखाच्या किंमतीची औषध आणि आरोग्य साहित्य खरेदी करण्याचे अधिकार महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना होते ते तीन चार वर्षा पूर्वी प्रशासकीय राजवटील प्रशासनाने काढून आरोग्य विभागाच्या उपायुक्ताकडे सोपविण्यात सोपविण्यात आले असून केवळ 50 हजार रुपये किंमतीची औषध व आरोग्य साहित्य खरेदीचे अधिकार मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोपविण्यात आल्याने मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अधिकार कमी करण्याचे कारण काय? आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना वैद्यकीय क्षेत्राची वैद्यकीय अधिकाऱ्या पेक्षा जास्त माहिती आहे का असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला.

KDMC
KEM Hospital Renaming: केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास हिरवा कंदील

वैद्यकीय विषयात मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना जास्त माहिती असल्याने त्यांचे कमी केलेले अधिकार त्यांना पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी सदस्य म्हात्रे यांनी केली आहे. आरोग्य साहित्य खरेदीच्या विषयांची सर्व माहिती घेऊन प्रशासनाने पुढील सभेत सादर करावी अशी मागणी करीत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल्याने अखेरीस आरोग्य विभागाचे सर्व विषय स्थगित ठेऊन प्रशासनाने पुरेशी माहिती घेऊन हे विषय समितीसमोर आणावेत असे स्थायी सभापती मल्लेश शेट्टी यांनी प्रशासनाला आदेशित केले. भाजपाच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाची चांगलीच पळता भुई झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news