KDMC Promotion Controversy : केडीएमसीची नियम डावलून पदोन्नती; पात्र कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित

माहिती अधिकारात बाब उघड
KDMC Promotion Controversy
KDMC pudhari photo
Published on
Updated on

कल्याण : कल्याण-डाेंबिवली महापालिकेच्या अग्नीशमन विभागातील पात्र असलेल्या १६ लिडिंग फायरमन यांची पदोन्नती जाणीवपूर्वक रोखण्यात आली आहे. तर नियम डावलून काही जणांना पदोन्नती दिली असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. या प्रकरणी उपायुक्त वंदना गुळवे यांनी महापालिकेच्या महासभेत दिशाभूल करणारी माहिती दिली असल्याचा आरोप काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेच्या महासभेत अग्निशमन विभागातील पदोन्नतीचा मुद्दा उपस्थित केला गेला. शिंदे सेनेच्या नगरसेविका शालिनी वायले यांनी यासंदर्भात प्रस्ताव सूचना मांडत पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती का देण्यात आली नाही ? असा प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपायुक्त गुळवे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडे जड वाहन चालविण्याचा परवाना नसल्याने त्यांची पदोन्नती रखडल्याचे सांगितले. मात्र ही माहिती वस्तूस्थितीशी विसंगत असल्याचा आरोप काँग्रेस गटनेत्या कुलकर्णी यांनी केला आहे.

KDMC Promotion Controversy
Ratnagiri News| आपण नियमबाह्य कामाचा जाब विचारला!

कुलकर्णी यांच्या मते, पदोन्नतीसाठी पात्र असलेले कर्मचारी हे लिडिंग फायरमन पदासाठी पात्र आहेत. या पदासाठी जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक असल्याचा कोणताही शासन निर्णय किंवा नियम अस्तित्वात नाही. जड वाहनपरवाना हा चालकपदासाठी आवश्यक असतो, लिडिंग फायरमन पदासाठी नव्हे, असा त्यांचा दावा आहे.

KDMC Promotion Controversy
Sambhajinagar News : जि. प. नवीन प्रशासकीय इमारतीचे काम रामभरोसे

याशिवाय काही कर्मचाऱ्यांची पदोन्नती यापूर्वीच करण्यात आली, मात्र त्याच निकषांवर इतर पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती नाकारण्यात आली. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या काही कर्मचाऱ्यांची निवृत्ती अवघ्या काही महिन्यांवर आली असून त्यांना त्यांच्या हक्काची पदोन्नती मिळालेली नाही. हा कर्मचाऱ्यांचा अधिकार असून त्यावर अन्याय होऊ नये, अशी भूमिका कुलकर्णी यांनी मांडली.

सभागृहात दिलेली माहिती विसंगत

माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीत आणि प्रशासनाने सभागृहात दिलेल्या माहिती पूर्णपणे विसंगत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून उपायुक्त गुळवे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news