KDMC Election Results 2026: डोंबिवलीत 'म्हात्रे' घराण्याचे वर्चस्व; दीर, भावजय आणि सून तीन वेगवेगळ्या पक्षांतून विजयी!

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, यात प्रभाग क्रमांक २१ मध्ये म्हात्रे कुटुंबाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
KDMC Election Results 2026
KDMC Election Results 2026file photo
Published on
Updated on

KDMC Election Results 2026

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, यात प्रभाग क्रमांक २१ मध्ये म्हात्रे कुटुंबाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, या एकाच कुटुंबातील तीन सदस्य दीर, भावजय आणि सून तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. यामुळे संपूर्ण शहरात म्हात्रे घराण्याच्या या 'राजकीय शाही' विजयाची चर्चा रंगली आहे.

चुरशीची लढत आणि निकाल

गुरूवारी (दि. १५) पार पडलेल्या अटीतटीच्या मतदानानंतर आज (दि. १६) सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. मतदानापूर्वीच सत्ताधारी महायुतीने २१ उमेदवार बिनविरोध निवडून आणत विरोधकांना मोठा धक्का दिला होता. मात्र, प्रभाग क्रमांक २१ मध्ये प्रत्यक्ष निवडणूक पार पडली आणि त्यात म्हात्रे कुटुंबातील सदस्यांनी बाजी मारली.

कोणाला किती मते मिळाली?

प्रभाग २१ मधील तीनही जागांवर म्हात्रे कुटुंबीयांनी विजय मिळवला आहे:

अ- प्रवर्ग (नागरिकांचा मागास प्रवर्ग): मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांनी भाजपचे उमेदवार प्रदीप जोशी यांचा पराभव केला. प्रल्हाद म्हात्रे यांना ९,९०८ मते मिळाली.

ब- प्रवर्ग (सर्वसाधारण महिला): भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या रविना म्हात्रे विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या सुजाता परब यांचा पराभव करत ८,५८५ मते मिळवली.

क- प्रवर्ग (सर्वसाधारण महिला): शिवसेनेच्या (शिंदे गट) रेखा म्हात्रे यांनी ठाकरे गटाच्या अर्चना पाटील यांचा पराभव केला. रेखा म्हात्रे यांना १०,८६१ मते मिळाली.

२१ जागांवर महायुतीचे नगरसेवक बिनविरोध

कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपाचे १५ आणि शिवसेना ६ मिळून २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यापैकी १९ बिनविरोध उमेदवार डोंबिवलीकर आहेत. डोंबिवली हा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. चव्हाण यांनी तब्बल १५ उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची किमया साधली. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही आपले कौशल्य दाखवत तेथे शिवसेनेचे सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आणले.

कल्याण-डोंबिवलीत भाजपाच्या रंजना पेणकर, आसावरी नवरे, मंदा पाटील, ज्योती पाटील, रेखा चौधरी, मुकंद तथा विशू पेडणेकर, महेश पाटील, साई शेलार, दिपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, हर्षदा भोईर, डॉ. सुनिता पाटील, पूजा म्हात्रे, रविना माळी, मंदार हळबे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news