

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत एकूण 7 अनधिकृत शाळा आहेत. ज्या तीन शाळांकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत. या तीन शाळांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने केडीएमसी आयुक्तांकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर होताच या तीन शाळांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.
यामध्ये बुद्धीष्ट इंटरनॅशनल शाळा, सनराईज इंग्लीश स्कूल टिटवाळा, सरीता एज्युकेशन ट्रस्टचे संकल्प इंग्लीशस्कूल यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार आहे. उर्वरीत चार शाळांचे इरादा पत्र आले आहे. त्यांच्या विरोधात काय करायचे याची प्रक्रिया सुरु आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या शाळांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येते. केडीएमसीकडून दरवर्षी प्रेसनेाट काढली जाते. कारवाईचा बडगा उगारला जातो. कोणतीही ठास कारवाई होत नाही असा आरोप नेहमी केला जातो.
केडीएमसीत एकूण 7 अनधिकृत शाळा आहे. त्यामध्ये यामध्ये डोंबिवलीतील बुद्धीष्ट इंटरनॅशनल शाळा, टिटवाळ्यातील सनराईज इंग्लीश स्कूल टिटवाळा, बल्याणी टिटवाळामधील सरीता एज्युकेशन ट्रस्टचे संकल्प इंग्लीश स्कूल, कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरातील प्रगत शिक्षण संस्थेचे क्रेस्ट मोड इंग्लीश स्कूल, कल्याण उंबर्डे येथील ट्रस्टचे सिंघानिया स्कूल, डोंबिली आयरेरोडतील सी. पी गोयंका स्कूल यांचा समावशे आहे.
केडीएमसीचे शिक्षण प्रशासकीय अधिकारी भारत बोरनारे यांनी सांगितले की, तीन शाळांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे लवकर ही कारवाई केली जाणार आहे. महापालिकेकडून नागरीकाना वेळोवेळी आवाहन केले जाते.