Thane theft case : कासारवडवलीत दुकान फोडून 7 लाखांचा मुद्देमाल लंपास

53 मोबाईलसह घड्याळ लंपास
Thane Crime News
कासारवडवलीत दुकान फोडून 7 लाखांचा मुद्देमाल लंपासFile Photo
Published on
Updated on

ठाणे : ठाण्यात चोरट्यांनी रेल्वे हद्दीत चोरीच्या अनेक घटना घडल्यानंतर आता चोरट्यांनी आपला मोर्चा शहराकडे वळविल्याचे दिसत आहे. 2 फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओम साईराम इलेक्ट्रॉनिक्स दुकान अज्ञात चोरट्याने फोडून त्यातील 7 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. दुकानातून 53 मोबाईल आणि घड्याळ घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोडबंदर रोडवरील इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला फोडल्याने घोडबंदर रोड परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कासारवडवली नाका या परिसरात राहणारे मोबाईल दुकानदार तथा तक्रारदार अशोक वैष्णव (51) यांनी दिलेल्या तक्रारीत, त्यांचे घोडबंदर रोडवरील साई निवास इमारतीत “ओमसाईराम इलेक्ट्रॉनिक” नावाचे मोबाईल व इलेक्ट्रॉनिक साहित्याचे दुकान आहे.

Thane Crime News
Dombivli water crisis : डोंबिवलीत तीव्र पाणीटंचाई

नेहमीप्रमाणे 2 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले असता, दुकानाच्या शटरचा लोखंडी ग्रीस तोडलेला, शटर वाकवलेले तसेच दोन्ही बाजूंचे कडी-कोयंडे तुटलेले आढळून आले.

दुकानात प्रवेश केल्यानंतर काउंटर व रॅकमध्ये विक्रीसाठी ठेवलेले वेगवेगळ्या कंपनीचे नवीन मोबाईल फोन, स्मार्ट घड्याळे तसेच वायफाय सेटअप बॉक्स चोरीला गेल्याचे निदर्शनास आला नाही. या घटनेत तीन लाख 51 हजार 955 रुपयांचे 18 मोबाईल, 25 हजार 590 रुपयांचे 2 मोबाईल, एक लाख 69 हजार 340 रुपयांचे 9 मोबाईल, 44 हजारांचे 5 मोबाईल, 35 हजार 400 रुपयांचे, 4 मोबाईल, 16 हजार 550 रुपयांचे 12 मोबाईल, 19 हजार 600 रुपयांचे टेक्नोचे 2 मोबाईल, तर 12 हजार 900 रुपयांचे मोटो कंपनीचा 1 मोबाईल आणि 15 हजार 500 रुपयांचे 5 स्मार्ट घड्याळे, 500 रुपयांचा वायफाय सेटअप बॉक्स तसेच दुकानातील दीड हजारांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Thane Crime News
KDMC revenue recovery drive : करचुकव्यांवर कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कारवाईचा बडगा

याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news