Kasara Local Train Block: ओव्हरहेड इक्विपमेंटसाठी रेल्वेचा मेगाब्लॉक

प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Kasara local train block
Kasara local train blockPudhari File Photo
Published on
Updated on

ठाणे: कसारा ओव्हरहेड इक्विपमेंट संबधित अडथळा दूर करण्यासाठी पूर्वतयारीच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमध्य रेल्वे, मुंबई विभागातील ओव्हरहेड इक्विपमेंट कामासाठी अडथळा दूर करण्याच्या पूर्वतयारी करीता कसारा (इगतपुरी - कसारा सेक्शन) येथे दिनांक 02.06.2026 ते दिनांक 05.06.2026 पर्यंत (दररोज दुपारी 2 तास) विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे.

दिनांक 02.06.2026 ते दिनांक 05.06.2026 पर्यंत 15.50 ते 17.50 वाजेपर्यंत ब्लॉक विभाग : अप लाईन, मिड लाईन, अप यार्ड लाईन, थळ घाट रिव्हर्सल केबिन आणि खर्डी दरम्यान प्लॅटफॉर्म 2, 3 आणि 4 दिनांक 02.06.2026 ते दिनांक 05.06.2026 या ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे कामकाज ब्लॉक कालावधीत आसनगाव आणि कसारा दरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

Kasara local train block
Murbad Water Crisis: मुरबाडच्या तहानलेल्या मातीत बैलगाडा संघटनेचे 200 टँकर धावले

दिनांक 02.06.2026 ते दिनांक 05.06.2026 या कालावधीत उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरीजनेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अनुक्रमे 13.10, 14.17 आणि 14.46 वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कसारा लोकल 19, 21 आणि 23 आसनगाव येथेच शॉर्ट टर्मिनेट केला जाईल.

कसारा येथून 15.35 वाजता सुटणारी 24 लोकल आसनगाव येथून 16.12 वाजता सुटेल, कसारा येथून 16.16 वाजता सुटणारी 26 लोकल आसनगाव येथून 16.54 वाजता सुटेल, कसारा येथून 17.02 वाजता सुटणारी 28 लोकल आसनगाव येथून 17.39 वाजता सुटेल.

Kasara local train block
Vangani Illegal Chawl Action: वांगणीत 100 हून अधिक अनधिकृत घरे जमीनदोस्त; महसूल विभागाची धडक कारवाई

दिनांक 02.06.2026 ते दिनांक 05.06.2026 पर्यंतच्या ब्लॉकच्या आधी आणि नंतरची शेवटची आणि पहिली लोकल कसारासाठी ब्लॉकच्या आधीची शेवटची उपनगरीय सेवा 17 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कसारा असेल, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 12.30 वाजता सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठीची ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल 22 कसारा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, जी कसारा येथून 14.42 वाजता सुटेल. कसारासाठीची ब्लॉकनंतरची पहिली लोकल 25 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कसारा असेल, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 16.50 वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठीची ब्लॉकनंतरची पहिली लोकल 30 कसारा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, जी कसारा येथून 18.17 वाजता सुटेल. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news