Railway Accident: लोकलवर सुरुंग स्फोटाचे रॉड, दगड उडून दोघे जखमी; खर्डी-कसारादरम्यान घडला अपघात

दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
Railway Accident
Railway AccidentPudhari
Published on
Updated on

कसारा: कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर तिसऱ्या चौथ्या लाईनचे काम सुरू आहे. दरम्यान खर्डीहून कसाराकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेच्या डब्यावर सुरुंग स्फोटाचे रॉड, दगड उडून दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

रोहीत नाना सारुक्ते, रा. उंबरकोन, घोटी व एकनाथ ठोंबरे अशी जखमींची नावे असून या दुर्घटनेत एकनाथ ठोंबरे याच्या डोक्याला रॉड लागून ते लोकलमधून खाली पडले त्यात ते गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना कसारा व शहापूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

Railway Accident
Jewellery Industry Update: हिरे, सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीला येत्या काळात येणार मोठा वेग

मात्र, एकनाथ ठोंबरे यांची प्रकृती गंभीर होत असल्यामुळे त्यांना ठाणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले असून या प्रकरणी आसनगांव रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे लाईनच्या कामाचा ठेका एका गुजरातच्या कंपनीला दिला आहे. मात्र हलगर्जीपणामुळे ब्लास्टिंगचा ढिगारा व रॉड उडून थेट धावत्या लोकलवर पडण्याचे प्रकार येथे कायम सुरू असतात; मात्र रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाच्या या तिसऱ्या रेल्वे मार्गीकेवर जाळ्या बसवण्याचे काम सुरू असताना लोकलमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना खर्डी-उंबरमाळी दरम्यान घडली.

जखमीतील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खर्डी-उंबरमाळी दरम्यान रेल्वेचे तिसऱ्या लाईनचे काम सुरू आहे. या कामात बेकायदा सुरुंग स्फोट उडवून डोंगर फोडले जात आहेत. त्यातच नव्याने तयार झालेल्या तिसऱ्या, चौथ्या मार्गीकेवर अभियांत्रिकी काम सुरू आहे.

त्यातच रेल्वे रुळाच्या बाजूला संरक्षण जाळ्या मारण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना सुरुंग स्फोटाचा वापर करून लोखंडी रॉड व जाळ्या बसवल्या जात आहेत. मात्र हे काम असताना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास खर्डी उंबरमाळी दरम्यान सुरू असलेल्या सुरुंग स्फोटात जाळ्या बसवण्याच्या कामावेळी दगडावर ड्रिल मशीनने होल करते वेळी ड्रिल मशीनचे मोठे रॉड खर्डीहून कसाराकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेच्या डब्यावर उडाले. या लोखंडी रॉडबरोबर ब्लास्टिंगचा मलिदा, दगडही लोकलवर उडाले. दुर्घटनेत लोकलच्या दरवाजाजवळील दोन प्रवासी जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेत जखमी एकनाथ ठोंबरे व रोहीत सारुक्ते यांना रेल्वेने मदतीचे आश्वासन दिल्याचे जखमी ठोंबरेचे भाऊ संजय ठोंबरे यांनी दिले आहे. तर एकनाथ ठोंबरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना केईएम रुग्णालयात दाखल केले आहे.

Railway Accident
Pratap Sarnaik: एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणार; प्रताप सरनाईक यांचा सकारात्मक प्रतिसाद

सुरुंग स्फोटांमुळे धरणेही धोक्यात...

दरम्यान कल्याण-कसारा रेल्वे मार्ग दरम्यान सुरू असलेल्या कामादरम्यान अडथळे ठरणाऱ्या डोंगर टेकड्या उद्ध्वस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरुंग स्फोट घडवले जात आहेत. बेकायदेशीररित्या करण्यात येणाऱ्या सुरुंग स्फोटकाच्या गाड्या लावून सुरुंग स्फोट घडवले जातात, मात्र याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. इको सेन्सिटीव्ह झोन वा धरण क्षेत्र असलेल्या या खर्डी कसारा परिसरात होणाऱ्या अवैध सुरुंग स्फोटांमुळे लोकल सेवा, प्रवासी या पाठोपाठ धरणे देखील धोक्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news