Kalyan Shil road flyover : दुसरा उड्डाणपूल उठलाय पलावा वासियांच्या जीवावर

ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे साहित्य खाली पडण्याची भीती; प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी
Kalyan Shil road flyover
दुसरा उड्डाणपूल उठलाय पलावा वासियांच्या जीवावर pudhari photo
Published on
Updated on

नेवाळी : सात वर्षानंतर कल्याण-शीळ रस्त्यावरील एका पलावा उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दुसर्‍या प्रगतीपथावर असलेल्या उड्डाणपूलाच्या कामाने नागरिकांची चिंता वाढवली आहे. सकाळ सायंकाळच्या सुमारास भर चौकात प्रवाश्यांची गर्दी असताना त्याठिकाणी अर्धवट असलेल्या उड्डाणपुलावर लोखंडी साहित्य ठेवण्यात आले आहे. सध्या परतीच्या पावसाचे थैमान संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. त्यामुळे वादळी वार्‍यात हे साहित्य प्रवाश्यांच्या टाळक्यात पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

कल्याण-शीळ रस्त्यावरील पलावा उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण झाल्यानंतर दुसरा उड्डाणपूल कधी पूर्ण होतय याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र हे काम करत असताना ठेकेदाराने त्या भागातील प्रवाश्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले आहे. उड्डाणपुलाचे काम ज्या भागात थांबविण्यात आले आहे त्या परिसराच्या कोपर्‍यात लोखंडी साहित्य सामग्री ठेवण्यात आली आहे.

Kalyan Shil road flyover
Ajit Pawar | वशिलेबाजीचे दिवस आता संपले आहेत : ना. अजितदादा पवार

सध्या राज्यात परतीच्या पाऊस वादळी वार्‍यासह येत असल्याने लोखंडी साहित्य प्रवाश्यांच्या डोक्यावर पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वर्दळीच्या वेळी दुर्घटना घडल्यानंतर शासनाने आणि लोकप्रतिनिधी दखल घेणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रश्नी संदप गावचे माजी सरपंच योगेश पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे ते म्हणाले कि, पलावा पुल हा नेहमी चर्चेत राहणारा पुल आहे.

Kalyan Shil road flyover
Abhyudaya Nagar redevelopment : अभ्युदयनगर पुनर्विकासात 620 चौरस फुटांपेक्षा मोठे घर

पुन्हा चर्चा नको आहे त्याच कारण आस की काटईकडून वाशीच्या दिशेने जाणार्‍या पुलाचे काम सुरू आहे. ते कासव गतीने पण या पुला खाली सकाळी प्रचंड वर्दळ असते. वाशी बस स्थानक वगैरे इतर पण बस थांबे आहेत. यापुलाच्या खाली खुप मोठे मोठे लोखंडी अँगल लावलेले आहेत. जर एखादी लोखंडी फ्रेम झाली पडली तर खुप मोठी दुर्घटना होऊ शकते. तर ज्या पण पक्षाच्या खात्यात हा पूल येतो त्यांनी वेळीच दखल घ्यावी या पुला खाली जाळी बांधण्यात यावी असं पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा प्रकाराकडे कधी गांभीर्याने लक्ष देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news