Kalyan Shil Road: ऐन गणपतीत नागरिकांचे हाल; कल्याण-शीळ महामार्गावर वाहतुकीत वीस दिवस बदल, अशी असेल वाहतुकीची व्यवस्था

kalyan shil road closure in night time: गर्डरच्या कामासाठी वाहतूक विभागाचा निर्णय
Kalyan Shil Road
Kalyan Shil RoadPudhari
Published on
Updated on

Kalyan Shil Road Closure Date Time Reason

डोंबिवली : कल्याण-शिळ मार्गावर मागील तीन दिवसापासून सर्व वाहतूकदारांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने वाहन चालकांकडून प्रचंड मनस्ताप व संताप व्यक्त केला जात होता. त्यातच या मार्गावर कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गाची कामे सुरू असून या रस्त्याच्या काँक्रीट खांबांवर तुळया (गर्डर) ठेवण्याच्या कामासाठी 11 ते 31 ऑगस्ट अशा वीस दिवसांच्या कालावधीत रात्री पावणे बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत वाहतूकीत बदल करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे.

Kalyan Shil Road
Kalyan Dombivli liquor ban : कल्याण-डोंबिवलीत दारूसह मांसाहारावर निर्बंध

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतूक बदलाची अधिसूचना काढली आहे. रात्रीच्या वेळेत वाहनांची संख्या कमी असते. त्यामुळे या वेळेत तुळया ठेवण्याची कामे होणार आहेत. एमएमआरडीएच्या नियंत्रणाखाली गवार कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेट्रो मार्गाची ही कामे सुरू आहेत. कल्याण तळोजा मेट्रो मार्गासाठी पत्रीपूल ते रूणवाल चौक, मानपाडा चौक ते सोनारपाडा चौक, सुयोग रिजन्सी अनंतम प्रवेशद्वार ते व्यंकटेश पेट्रोल पंप दरम्यानची कामे प्रगतीपथावर आहेत. तीन टप्प्यातील मेट्रो मार्गाच्या आधार खांबांवर तुळया ठेवण्याची कामे येत्या वीस दिवसात टप्प्याने केली जाणार आहेत. त्यामुळे हा वाहतूक बदल करण्यात आला आहे, असे उपायुक्त शिरसाट यांनी सांगितले.

11 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान मानपाडा चौक ते सोनारपाडा चौक दरम्यान तुळया ठेवण्याची कामे केली जाणार आहेत. 21 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट कालावधीत सुयोग हॉटेल रिजन्सी अनंतम ते व्यंकटेश पेट्रोल दरम्यान तुळया ठेवण्याची कामे ठेकेदार कंपनीकडून केली जाणार आहेत.

Kalyan Shil Road
Kalyan Mobile Snatching: मोबाईल चोरामुळे 26 वर्षांच्या गौरवने गमावला पाय, जखमी अवस्थेतही चोरट्याने पैसे लुटले; कल्याणची घटना

अशी असेल वाहतुकीची व्यवस्था

या कालावधीत कल्याण-शिळ महामार्गावर कल्याणकडे येणार्‍या वाहनांना मानपाडा चौकात प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने मानपाडा चौकात डावे वळण घेऊन एमआयडीसीच्या सर्विस रोडने सोनारपाडा चौकात जाऊन तेथून नियमितच्या मार्गिकेतून धावतील. कल्याण, डोंबिवलीकडून सुयोग हॉटेल, रिजन्सी अनंतम प्रवेशव्दार चौक येथून शीळफाटाकडे जाणार्‍या वाहनांना सुयोग हॉटेल, रिजन्सी अनंतम चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना मुभा

कल्याण-शिळ, मानपाडा रस्त्याने कल्याणकडे येणार्‍या वाहनांना सोनारपाडातील डोंंबिवली नागरी सहकारी बँक चौकात प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने डीएनएस चौकातून खांब क्रमांक 144 येथून एमआयडीसीच्या सर्विस रोडने सुयोग हॉटल रिजन्सी अनंतम् चौकातून पुन्हा कल्याण-शिळ महामार्गाने इच्छित स्थळी जातील. तथापी अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना यातून मुभा देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news