Crime News: पत्नीबाबतचा संशय ठरला वादाचे कारण; कल्याण-शिळ महामार्गावर मुलाकडून पित्याची हत्या

पिसवली परिसरातील घटना; पत्नी आणि वडिलांमध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून ३२ वर्षीय मुलावर आरोप
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

डोंबिवली: कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या पिसवली परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून जन्मदात्या पित्याची चाकूने भोसकून हत्‍या केल्याची घटना घडली. मुरली शहा (५५) असे मृत्‍यू झालेल्या पित्याचे नाव आहे.

या प्रकरणातील आरोपी विनोद शहा (३२) याच्या डोक्यात गेल्या अनेक दिवसांपासून एकाच विचाराने घर केले होते. त्याची पत्नी आणि पिता मुरली यांच्यात काहीतरी अनैतिक सुरू आहे. मानगुटीवर बसलेल्या संशयाच्या भूताने विनोदची झोप उडवली होती.

Crime News
Maharashtra Drought Relief: दुष्काळग्रस्तांसाठी पुढील ६ ते ८ महिने विशेष नियोजन; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

घरात रोज याच विषयावरून महाभारत घडायचे. शनिवारी मध्यरात्री वाद टोकाला गेला आणि विनोदचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने स्वयंपाकघरातील धारदार चाकू हातात घेतला आणि समोर उभ्या असलेल्या पित्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. मुरली यांनी जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा केला.

किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुरली रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले होते आणि मुलगा विनोद हातात रक्ताने माखलेला चाकू घेऊन उभा होता.

Crime News
Mumbai SRA Projects Audit: मुंबईतील रखडलेल्या SRA प्रकल्पांचे ऑडिट होणार; राहुल शेवाळे यांचा समितीत समावेश

घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नोंदवून खुनी विनोदला ताब्यात घेऊन त्याला अटक केली.

पित्याला ठार मारण्यासाठी वापरलेला चाकू विनोदकडून जप्त करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मुरली यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूग्णालयाकडे पाठवून दिला. केवळ संशयाच्या आगीने एका हसत्या खेळत्या कुटुंबाची कशी राखरांगोळी झाली. या घटनेने संपूर्ण पिसवली परिसर हादरून गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news