Mumbai SRA Projects Audit: मुंबईतील रखडलेल्या SRA प्रकल्पांचे ऑडिट होणार; राहुल शेवाळे यांचा समितीत समावेश

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतील कायदेशीर अडचणींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारची तज्ज्ञ समिती; १० महिन्यांत प्राथमिक अहवाल सादर होणार
Rahul Shewal
Rahul ShewalPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यासाठी, झोपु योजनेच्या प्रकल्पांमधील कायदेशीर पेच सोडविण्यासाठी आणि झोपडपट्टीमुक्त मुंबईचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

शासन निर्णयानुसार, तज्ज्ञांची एक समिती गठित करण्यात आली असून, या कमिटीच्या माध्यमातून रखडलेल्या एसआरए प्रकल्पांचे ऑडिट केले जाणार आहे.

Rahul Shewal
Crime News: लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने मित्राच्याच अल्पवयीन मुलीची हत्या; कुर्ला येथील धक्कादायक घटना

गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या या तज्ज्ञ समितीमध्ये शिवसेना सरचिटणीस माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

वास्तविक, एसआरए प्रकल्प रखडल्याने न्यायालयात अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षांत दाखल करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने पुढाकार घेऊन १० जुलै २०२६ रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढला. यानुसार गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली.

Rahul Shewal
Maharashtra Drought Relief: दुष्काळग्रस्तांसाठी पुढील ६ ते ८ महिने विशेष नियोजन; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

या समितीमध्ये अध्यक्षांसह नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार पराग अळवणी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगररचना विभागाचे संचालक, मुंबई महानगरपालिकेच्या विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता, पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता यांच्यासह ३ वास्तुविशारदांचा समावेश करण्यात आला आहे.

या समितीला प्रामुख्याने, महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे ऑडिट करणे अनिवार्य आहे. तसेच, ८ मे २०२६ रोजी या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद मुद्दे, वकील आणि कायदे तज्ज्ञांनी केलेल्या शिफारसी याबाबत समितीला अभ्यास करावा लागेल.

याव्यतिरिक्त, झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प जलदगतीने राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या शिफारसी राज्य सरकारला करून झोपडपट्टीतील रहिवाशांना सन्मानजनक आयुष्य देण्यासाठी ही समिती कार्यरत राहील.

आवश्यक त्या शिफारसींसह येत्या १० महिन्यांत प्राथमिक अहवाल समितीच्या वतीने शासनाला सादर करण्यात येईल.

विविध कारणांमुळे मुंबईतील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प खूप वर्षांपासून रखडले आहेत. अनेक झोपू योजनांमध्ये कायदेशीर पेच निर्माण झाले आहेत. एसआरए प्रकल्प रखडल्याने हवालदिल झालेल्या मुंबईतल्या शेकडो कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आणि त्यांना सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याची संधी देण्यासाठी आम्ही समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करू. रखडलेल्या प्रकल्पांमुळे त्रस्त असलेल्या कुटुंबांना शिवसेना - भाजप महायुतीचे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही.

- राहुल शेवाळे, शिवसेना, नेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news