Kalyan Crime: कल्याणच्या जाळीतकांडाला कलाटणी

भिक्षेकरी महिलेने स्वतःला घेतले जाळून; सीसीटीव्हीमुळे सत्य उजेडात
Kalyan Crime |
कल्याणच्या जाळीतकांडाला कलाटणीFile Photo
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रविवारी सकाळच्या जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला होता. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले चौक पोलिसांनी केलेल्या चौकस तपासानंतर सोमवारी या घटनेला कलाटणी मिळाली आहे. सुरूवातीला हा घातपाताचा प्रकार असल्याचा कयास बांधण्यात येत होता. मात्र कल्याण परिसरात भिक्षा मागून पोट भरणाऱ्या या महिलेचे मानसिक संतुलन ढासळले होते. त्यातूनच तिने स्वतःला जाळून घेतल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या संदर्भात पोलिस हवालदार प्रकाश ज्ञानदेव बांगर (43) यांनी सरकारतर्फे दिलेल्या माहितीनुसार पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 194 अन्वये अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन परिसरात महालक्ष्मी हॉटेलच्या मागे असलेल्या नाल्यात एका 45 ते 50 वयोगटातील महिलेला स्वतःला जाळून घेत असल्याने घटनास्थळी रूग्णवाहीका आणि पोलिसांची मदत हवी असल्याचा कॉल पोलिसांना प्राप्त झाला.

Kalyan Crime |
Budget session Maharashtra : शिंदेंकडील महत्त्वाची खाती अधिवेशनापुरती इतर मंत्र्यांकडे

मुरबाडकर इस्टेटमधील मुरबाडकर कंपाऊंड इमारतीच्या उत्तर बाजूस इमारत व पत्र्याचे कंपाऊंडद्वारे तयार झालेल्या कोपऱ्याच्या ठिकाणी ऐका अनोळखी महिलेच्या कपड्यांना आग लागून ती खाली पडलेली दिसली. तसेच तिच्या बाजूस असलेला कचराही जळत असताना आढळून आला. घटनास्थळी तात्काळ पोहोचून सपोनि हनुमंत हुंबे आणि सपोनि विनोद पाटील यांच्यासह अग्नीशमन दलाच्या जवानांच्या मदतीने तेथील आग विझविण्यात आली.

Kalyan Crime |
High Court : 24 महिन्यांत संपादन न केल्यास जमिनीचे आरक्षण आपोआप रद्द

लागलेल्या आगीत सदर महिलेचे शरीर भाजून ती निपचित पडलेली होती. या महिलेला रूग्णवाहिकेतून केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.

फुटेजमध्ये आत्मदहन केल्याचे स्पष्ट

या संदर्भात सदर प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी सदर महिलेने आत्महत्या केल्याचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून स्पष्ट दिसून येत असल्याचे सांगितले. रविवारी दुपारी 1.40 ते 1.50 दरम्यान हा प्रकार घडला आहे. एका बाजूने पत्रा आणि दुसऱ्या बाजूने भिंत असलेल्या ठिकाणी मानसिक संतुलन बिघडलेली ही महिला तासभर बसली होती. अंघोळ केल्यानंतर तिने आगपेटीचा वापर करून स्वतःला जाळून घेतल्याचे फुटेजमध्ये दिसून येते. घटनास्थळी असलेली प्लास्टिकची टाकी वितळून गेली आहे. तेथील एका आस्थापनेकडून सीसीटीव्ही फूटेज मागवून घेतले असून त्याद्वारे अधिक तपास करण्यात येत असल्याचे सपोनि विनोद पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news