Kalyan molestation case: महाविद्यालयीन विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य; पीडीएफ वाचून दाखवण्याच्या बहाण्याने बोलावले घरात

विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल; एमएफसी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
molestation case
molestation casePudhari
Published on
Updated on

डोंबिवली: मोबाईलमधील पीडीएफ फाईल वाचून दाखविण्याच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीला घरात बोलावून तिच्यासमोर अश्लील कृत्य करणाऱ्या 40 वर्षीय आरोपीच्या विरोधात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपी फरार झाला असून हा आरोपी अद्याप हाती लागलेला नाही. पोलीस त्याचा कसोशीने शोध घेत आहेत.

molestation case
Kalyan Dombivli Temperature: कल्याण-डोंबिवलीचा पारा तब्बल 41 पार

दरम्यान या आरोपीच्या तावडीतून निसटून विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद नोंदविली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तर दुसरीकडे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून रहिवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे.

या संदर्भात पालिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी राहत असलेल्या परिसरातच शेजारी आरोपी राहतो. बुधवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास या आरोपीने शेजारी राहणाऱ्या तरुणीला त्याच्या मोबाईलमधील पीडीएफ फाईल समजत नसल्याचे सांगून मदतीच्या बहाण्याने घरी बोलावले होते.

शेजारधर्म असल्यामुळे तरुणी त्याच्या मदतीसाठी गेली होती. पीडितेच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी तो आरोपी घरामध्ये एकटाच होता. त्याची पत्नी व मुले ही घरी नव्हती. दरम्यान तरुणी मोबाईलमधील पीडीएफ फाईल पाहत असताना आरोपीने तिच्यासमोर अश्लील कृत्य केले.

molestation case
Raigad By-Election: रायगडमध्ये पाच सरपंचांसह 30 सदस्यपदांसाठी पोटनिवडणुकीसाठी होणार मतदान

या प्रकारामुळे भयभीत झालेल्या तरुणीने तत्काळ तेथून पळ काढत आपल्या कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. कुटुंबीयांनी तरुणीसह पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दाखल केलेल्या तक्रारीनुसार कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी या आरोपीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांचे विशेष पथक तैनात...

दरम्यान आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची खबर मिळताच आरोपी हा फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तैनात केले आहे. दरम्यान, आरोपी हा एका खासगी कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत असून एकीकडे आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे लवकरच या आरोपीला अटक करण्यात येणार असल्याचा असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. अधिक तपास करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news