Kalyan Crime | कल्याण-मलंगगड रोडवर पूर्ववैमनस्यातून पाणीपुरी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला

हल्लेखोर चौकडीचा शोध सुरू, हल्ल्यात लोखंडी रॉड, चाकू आणि लाकडी दांडके यांसारख्या हत्यारांचा वापर
Kalyan Crime
Kalyan CrimePudhari
Published on: 
Updated on: 

Malanggad Road Attack

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील ९० फूट मलंग रोडवर एका पाणीपुरी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी चौघा हल्लेखोर बदमाशांविरूद्ध गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला आहे. हल्ल्यात लोखंडी रॉड, चाकू आणि लाकडी दांडके यांसारख्या हत्यारांचा वापर करण्यात आला असून या जीवघेण्या हल्ल्यात जायबंदी झालेल्या पाणीपुरी विक्रेत्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत.

मुकेश जयसवाल (वय ३५) असे हल्ल्यातून बचावलेल्याचे नाव आहे. तो त्याच परिसरात रस्त्याच्या कडेला पाणीपुरीचा ठेला लावतो.

Kalyan Crime
Kalyan Crime : कल्याण-आंबिवलीत फटका गँगची पुन्हा दहशत

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ठेला आवरून आपला मित्र अजय याच्यासोबत घरी परतत होता. इतक्यात चौघा बदमाशांनी त्याचा रस्ता अडवला आणि त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मुकेशला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात तित्या उर्फ राहुल (२५) याच्यासह चार बदमाशांची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी सर्वांविरुद्ध जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल केला असून बदमाशांच्या शोधात पथके रवाना झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.