

कल्याण : कल्याण शहरातील एकही बालक लसीपासून वंचित राहू नये या उदात्त हेतूने घरा-घर टिका 'लस कल्याणाची' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत -जून २०२५ मध्ये घर घर टीका ह्या कार्यक्रमाअंतर्गत लस जागरूकता मोहीम सुरू झाली आहे. 'लस कल्याणाची' नावाचा हा उपक्रम कल्याण महापालिका क्षेत्रात सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम पुढील सहा महिने सुरू राहणार आहे.
या विशेष मोहिमेमध्ये लसीकरणाविषयी योग्य ती माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर केले जाणार आहेत.हा व्यापक जनजागृती उपक्रम सुरू करण्यात आला असून, यामध्ये झेडएमक्यू, पुढारी मीडिया आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सहभागी झाले आहेत. या तीन संस्थाच्या संयुक्त विद्यमाने पुढील सहा महिन्यांसाठी हे विशेष अभियान राबिविले जाईल. या उपक्रमामागे तळागाळातील प्रत्येक कुटुंबापर्यंत माहिती पोहोचवून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. तसेच संपूर्ण लसीकरण हा ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
या शहरातील प्रभावशाली व्यक्तिमत्व यांना एकत्र घेऊन लोकांमध्ये जनजागृती करणे आणि सर्वांना एकत्र आणून काम केले जाईल. स्थानिक नागरिकांच्या मनातील शंका दूर करून लसीकरणाचे फायदे सांगितले जातील. तसेच मुलांना आवश्यक असलेले वेगवेगळे लसीकरण वेळेत कसे पूर्ण होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 'प्रत्येक बालकाला सुरक्षित आरोग्याचा हक' हे या मोहिमेचे मुख्य सूत्र आहे. या सूत्राला अनुसरू मोहिम राविवली जाईल.
या अभियानाचा शुभारंभ करण्यापूर्वी लसीकरण मोहिमेत सहभागी होणाऱ्या सर्व प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन कल्याण येथील मोरया सभागृहात करण्यात आले होते. या कार्यशाळेत लसीकरणाच्या पद्धती, जनजागृती तंत्र, संवाद कौशल, आणि नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधताना घ्यायची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षण सत्रात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले. लसीकरण हे फक्त आरोग्यसेवा नाही, तर समाजाच्या भविष्यासाठीचा एक सुरक्षित असा भक्कम पाया आहे, असे मत या कार्यशाळेत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान झेड एम क्यू आणि पुढारी मीडियाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेत लसीकरणाबाबत समाजात असलेले गैरसमज आणि त्या दर करण्याच्या उपाय योजना यावर विवेचन केले. माहितीअभावी काही पालक आपल्या मुलांना आवश्यक त्या लसी देत नाहीत याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
आमचा प्रकल्पातील प्राथमिक दृष्टिकोन म्हणजे डिजिटल माध्यमाचा वापर करून प्रथम कोल लसीकरणाबाबत माहिती देणे आणि नंतर ती समुदायापर्यंत पोहचवणे. तसेच लोकांना थेट माहिती व्हावी म्हणून प्रत्यक्ष काम करण्याच्या ठिकाणी तसेच धार्मिक स्थळांमध्ये लोकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. लसीकरणाचे वेळापत्रक आणि आवश्यक कागदपत्रे यांची माहितीही या मोहिमेत पुरवली जाईल. तसेच या अभियानाची व्यापक प्रसिद्धी केली जाईल.
कल्याण महापालिका क्षेत्रातअशी असेल मोहिम
ज्या नागरिकांना लसीकणाबद्दल गैरसमज आहे अशा नागरिकांना आणि त्यांच्या पाल्यंना लसीकरणाची योग्य माहिती देऊन प्रोत्साहित केले जाईल. 'लस कल्याणाची' या उपक्रमाने केवळ आरोग्यदायी समाजनिर्मितीच नव्हे, तर एकजुटीची भावना बळकट करण्यासाठी हा संकल्प अधिक दृढ करण्यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आली आहे.
माध्यमांचे कर्तव्य फक्त बातम्या देणे नसून समाजाच्या आरोग्यविषयक जबाबदाऱ्या उचलणेही आहे. 'लस कल्याणाची' हा उपक्रम त्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे.
अनुप नायर, सह-आयोजक, पुढारी मीडिया
सरकारकडून मोफत दिल्या जाणाऱ्या लसी केवळ बालकांचे नव्हे, तर संपूर्ण समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवतात. या उपक्रमामुळे कल्याणमधील लसीकरणाचे प्रमाण शंभर टक्क्यांपर्यंत वाढेल, असा आम्हाला विश्वास आहे.
आरोग्य अधिकारी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका