Kalyan Crime News: झुंझाराव मार्केटमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; १५ तरुणींसह १७ जणांना बेड्या

महात्मा फुले चौक पोलिसांची कारवाई; १५ तरुणी आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतल्याची माहिती
Arrested
ArrestedPudhari
Published on: 
Updated on: 

डोंबिवली: कल्याण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या झुंझाराव मार्केट परिसरातील गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करत मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

गुरुवारी दुपारी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी १५ तरुणी आणि २ पुरुष अशा एकूण १७ जणांना ताब्यात घेतले असून या कारवाईमुळे संपूर्ण मार्केट परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेस्ट हाऊसमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अनैतिक धंदा राजरोसपणे सुरू होता. स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या

माहितीनुसार, या गेस्ट हाऊसमध्ये वेश्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने मंडीमध्ये भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या सर्वसामान्य गृहिणी आणि कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तेथून ये-जा करणे देखी‍ल मुश्किल झाले होते. याबाबत परिसरातील रहिवाशांसह व्यापाऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. तरीही हा अवैध धंदा अधिकच फोफावत चालला होता.

Arrested
Mumbai Mayor Office Bomb Threat: मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

अखेर महात्मा फुले चौक पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून छापेमारीची योजना आखली. ठरल्याप्रमाणे गुरुवारी दुपारच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने गेस्ट हाऊसवर अचानक छापा टाकला असता तेथे देह व्यापार सुरू असल्याचे निदर्शनास आले.

या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून १५ तरुणींना ताब्यात घेतले. यातील दोन पुरुषांमध्ये गेस्ट हाऊसचा मॅनेजर आणि एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. हे दोघे सदर ठिकाणी संपूर्ण रॅकेट चालवत होते.

Arrested
Sanjay Gandhi National Park Firing Case: डॉ. पालांडे यांची वैद्यकीय नोंदणी रद्द करा; भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांची आयुक्तांकडे मागणी

या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकबळीरामसिंह परदेशी यांनी कारवाईला दुजोरा देत सांगितले की, या सर्व आरोपींविरोधात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे कल्याणमधील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news