Kalyan Theft | कल्याणात रूग्णालयामधून रूग्णाचे १.३० लाखांचे दागिने लंपास

एमएफसी पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू
Kalyan Hospital Patient Gold Stolen
Kalyan Hospital Patient Gold StolenPudhari
Published on
Updated on

Kalyan Hospital Patient Gold Stolen

डोंबिवली : कल्याणच्या होली क्रॉस हॉस्पिटलमध्ये एक्स-रे काढताना चोरट्याने दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात जखमी झालेल्या वडिलांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेल्या मुलाचा विश्वासघात करून अनोळखी व्यक्तीने १ लाख ३० हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

Kalyan Hospital Patient Gold Stolen
Kalyan Dombivli Temperature | सूर्याचा प्रकोप! कल्याण-डोंबिवलीत रात्री ३०.४ अंश; १३ वर्षांतील सर्वोच्च तापमान

या संदर्भात कल्याण पश्चिमेकडील विजय बागेत असलेल्या मंदार अपार्टमेंटमध्ये राहणारे अभिरूप अरुण शहा (वय ३२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी १६ मार्च रात्री ११ ते रविवारी १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० दरम्यान हा प्रकार घडला.

अभिरूप यांचे वडील अरूण हे रामबाग लेन नं. ५ येथे रस्ता क्रॉस करत असताना एका दुचाकीने त्यांना ठोकर दिली होती. त्यावेळी त्यांचा मित्र निरंजन मेढे व त्या अनोळखी व्यक्तीने अभिरूपच्या वडिलांना उपचारासाठी कर्णिक रोडवरील हॉस्पिटल येथे घेऊन गेले.

Kalyan Hospital Patient Gold Stolen
Kalyan Crime : कल्याण हादरले! माहेरी आलेल्या लेकीची पित्याने केली हत्या

डॉक्टरांनी वडिलांना ॲडमिट करून घेतल्यानंतर दुसऱ्या वॉर्ड रूममध्ये वडिलांचा एक्स-रे काढण्याकरिता डॉक्टर गेले होते. त्याचवेळी वडिलांच्या गळ्यातील सोन्याची चेन व अंगठी तसेच चांदीचा कडा व अंगठी असे एकूण १ लाख ३० हजार ५०० रूपये किंमतीचे दागिने काढून विश्वासाने त्या अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात दिले. मात्र, तो तेथून पळून गेला.

गेल्या दोन महिन्यांपासून शहा कुटुंबीय या घटनेपासून अनभिज्ञ होते. मात्र हा प्रकार समजल्यानंतर अभिरूप शहा यांनी वडील अरूण यांचे दागिने लांबविणाऱ्या चोरट्याचा शोध घेण्याची महात्मा फुले चौक पोलिसांकडे मागणी केली. पोलिसांनी अभिरूप शहा यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हॉस्पिटल आणि परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेल्या चोरट्याचा पोलिस हवालदार आनंद कांगरे आणि त्यांचे सहकारी शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news