Kalyan Girl Rape Murder Case | नराधम विशाल गवळीसह पत्नीला सात दिवसांची पोलिस कोठडी

कल्याण न्यायालयात केलं होतं हजर
Kalyan Girl Rape Murder Case
विशाल गवळीसह पत्नीला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. Photo by Hardeep kaur
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क | कल्याणमध्ये एका 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. त्याआधी तिचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला अटक केली होती. आज (दि.26) आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यो दोघांनाही कल्याण येथे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने दोघांनाही सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

विशाल गवळीला न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्या समोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने आरोपी आणि त्याच्या पत्नीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिस आरोपीला घेऊन ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान या घटनेमुळे कल्याणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपीचा थेट एन्काउंटर करा अशा तीव्र प्रतिक्रिया कल्याणकरांकडून येत आहेत.

काय आहे घटना ? विशालसह पत्नी कशी आली जाळ्यात 

23 डिसेंबरला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. आईकडून 20 रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. मात्र ती परत न आल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला. बराच कालावधी उलटून ही मुलगी परत न आल्याने मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळशेवाडी पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य दाखवत या प्रकरणाचा तपास सुरू केला. दुसर्‍या दिवशी म्हणजे 24 डिसेंबर रोजी मुलीचा मृतदेह कल्याण नजीक बापगाव परिसरात सापडला. विशाल गवळी हा विकृत स्वभावाचा असल्याचे समोर आले आहे. त्यानेच चिमुकलीची अत्याचार करुन अमानुष हत्या केली.

Kalyan Girl Rape Murder Case
अल्पवयीन मुलीची अत्याचार करुन अमानुष हत्या, कल्याणकरांमध्ये तीव्र संतापाची लाट

अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळी याची पत्नी साक्षीने सांगितलं की, मुलीला सायंकाळी पाच वाजता घरात घेतले. त्यावेळी विशाल गवळीने मुलीसोबत गैरकृत्य करून हत्या केली. त्यानंतर एका मोठ्या बॅगमध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता. आरोपीची पत्नी बँकेत नोकरी करत असल्याने संध्याकाळी 7 वाजता घरी आली. त्यावेळी आरोपी पतीने पत्नीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे ऐकून तिला धक्काच बसला. मात्र नंतर 7 वाजता दोघे पती-पत्नी एकत्र बसून मृतदेहाचे काय करायचे याबद्दल योजना आखली. त्याआधी घरातील रक्त दोघांनी पुसून टाकले. रात्री 8.30 वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली. 9 वाजता बापगावच्या दिशेने रवाना झाले. तिथे मृतदेह फेकून दोघे घरी परतले. घरी परतत असताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तेथून आपल्या पत्नीच्या गावी येथे निघून गेला. पत्नी साक्षी मात्र येथेच राहिली. मात्र घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशालने हे कृत्य केल्याचा संशय आला.

आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी शेगावमधून अटक केली आहे. त्याची पत्नी साक्षीची कबुली आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना त्याला अटक करण्यास मदत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news