Kalyan Dombivli Politics : केडीएमसीत महायुतीला हादरा; भाजपचा अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात!

मनसेला सत्तेतून हटवा, अन्यथा विरोधी बाकांवर बसण्याचा इशारा
KDMC
KDMCPudhari
Published on
Updated on

कल्याण : पुण्यातील महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मनसेने कार्यकर्त्यांकडून काढल्याने त्याचे जोरदार पडसाद कल्याण-डोंबिवली महापालिकेत उमटले आहे. शिंदे सेनेने मनसेशी असलेली युती तोडावी. त्यांना सत्तेतून बाहेर काढावे. अन्यथा भाजप महायुतीतून बाहेर पडून विरोधी बाकावर बसणार असा इशारा भाजपने मंगळवारीच दिला होता.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिकेच्या प्रशासकीय भवनात भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत अंत्यत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तो भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठविला आहे. आत्ता त्यावर प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील, असे भाजपचे उपमहापौर राहुल दामले यांनी सांगितले.

KDMC
Navi Mumbai airport cargo : एनएमआयएवर ‘रुस्लान’ची दमदार एन्ट्री

भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मंगळवारीच शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांना पत्र दिले होते. त्यावर शिंदे सेनेकडून काही एक प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी भिवंडी आणि अंबरनाथमध्ये भाजपने काय केले. त्यामुळे युती धर्म कसा पाळायचा हे आम्हाला शिकवू नका. महायुतीतून भाजप बाहेर पडण्याची भाषा केली असताना त्यावर कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही एक भाष्य केलेले नाही.

त्याचबरोबर मनसेचे नेते राजू पाटील यांनीही त्यावर काही एक भाष्य केलेले नाही. मात्र मनसेने स्थानिक पातळीवर प्रतिक्रिया हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असे वक्तव्य केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज महापालिकेतील प्रशासकीय भवनात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते.

KDMC
Mumbai footpath encroachment : मालाडमध्ये फुटपाथ मोकळा करण्यासाठी जागोजागी बॅनर

या बैठकीत नेमका अत्यंत महत्वाचा निर्णय काय घेतला ? हे सांगणे उपमहापौर दामले यांनी टाळले आहे. मात्र घेण्यात आलेला निर्णय हा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना पाठविण्यात आला आहे. त्यावर आत्ता प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील असे स्पष्ट केले आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला, या विषयी कमिटीमधील एकानेही नेमके भाष्य केले नसले तरी या बैठकीत शिंदे सेनेने मनसेला सत्तेतून बाहेर काढावे. अन्यथा भाजप विरोधी बाकावर बसणार असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला प्रदेशाध्यक्ष शिक्कामोर्तब करणार की नाही? याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news