Navi Mumbai airport cargo : एनएमआयएवर ‘रुस्लान’ची दमदार एन्ट्री

अबुधाबीहून ४६ टन माल घेऊन आले महाकाय मालवाहू विमान
Navi Mumbai airport cargo
Navi Mumbai airport cargopudhari photo
Published on
Updated on

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (एनएमआयए) जगातील सर्वात मोठ्या मालवाहू विमानांपैकी एक असलेल्या अँटोनोव्ह एएन-१२४ रुस्लानचे दमदार आगमन झाले. अबुधाबीहून तब्बल ४६ टन माल घेऊन हे महाकाय विमान नवी मुंबईत दाखल झाले. या आगमनामुळे एनएमआयएची मोठ्या आकाराच्या आणि अवजड मालवाहतुकीची क्षमता अधोरेखित झाली आहे.

अँटोनोव्ह एएन-१२४ रुस्लान हे अवजड आणि आकाराने मोठ्या मालाच्या वाहतुकीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेले मालवाहू विमान आहे. विमानाच्या पुढील भागाचा दरवाजा उघडण्याची विशेष सुविधा असल्याने नेहमीच्या कार्गो विमानातून वाहतूक करणे कठीण असलेल्या मोठ्या आकाराच्या वस्तूही सहजपणे चढविता आणि उतरविता येतात.

Navi Mumbai airport cargo
Thane water diversion : ठाणे तहानलेले अन् पाणी गोदावरीला!

एनएमआयएवर या महाकाय विमानाचे आगमन विमानतळाच्या कार्गो ऑपरेशन्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मोठ्या आकाराची, अवजड तसेच विशेष प्रकारची मालवाहू विमाने हाताळण्याची क्षमता विमानतळाकडे असल्याचे या आगमनातून स्पष्ट झाले आहे.

आधुनिक धावपट्टी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि कार्गो हाताळणीची सक्षम व्यवस्था यामुळे एनएमआयए आगामी काळात देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ‘रुस्लान’च्या आगमनाने या क्षमतेला आणखी बळ मिळाले असून, नवी मुंबईच्या विमानतळाला जागतिक कार्गो नकाशावर स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

Navi Mumbai airport cargo
Mumbai footpath encroachment : मालाडमध्ये फुटपाथ मोकळा करण्यासाठी जागोजागी बॅनर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news