Kalyan Dombivli Air Pollution: हवा प्रदूषण नियंत्रण नियम धाब्यावर बसवणाऱ्या दोन बेकऱ्यांवर कारवाई; केडीएमसी क्षेत्रातील दोन बेकऱ्या सील

Two bakeries sealed in Kalyan Dombivli: विकासकाला दहा हजारांचा दंड
Kalyan Dombivli Air Pollution
Kalyan Dombivli Air PollutionPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाढते हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून याच मोहिमेअंतर्गत फ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या वतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन बेकऱ्या सील करण्यात आल्या. तर डोंबिवली पूर्वेतील आर. पी. रोड येथे रस्त्यावर बांधकाम साहित्य विखुरून हवा प्रदूषण करणाऱ्या एका नामांकित विकासकाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली ही धडक कारवाई करण्यात आल्याने परिसरातील नियमभंग करणाऱ्या आस्थापनांचे धाबे दणाणले आहेत.

Kalyan Dombivli Air Pollution
Goregaon Mulund Link Road: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड डिसेंबर २०२८ पर्यंत! चौथ्या टप्प्याच्या कामाने पकडला वेग

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार शहरातील हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी हवा प्रदूषण प्रतिबंधक कायदा १९८१ च्या अनुषंगाने महापालिकेने २०२६ साठी विशेष मार्गदर्शक तत्वे लागू केली असून या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शना खाली सर्व प्रभाग क्षेत्रांमध्ये विशेष पथकामार्फत तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे.

याच मोहिमे दरम्यान भोईरवाडीतील बेकरी आणि त्रिमूर्तीनगर परिसरातील बेकरी या दोन बेकऱ्यांमध्ये दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर करून धूर आणि प्रदूषण केले जात असल्याचे निदर्शनास आले होते.

याबाबत दोन्ही बेकरीच्या चालकांना यापूर्वी वेळोवेळी नोटिसा बजावून हवा प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

Kalyan Dombivli Air Pollution
Galai Devi Temple: हरवलेली मौल्यवान वस्तू पुन्हा मिळते, अशी श्रद्धा! नावजेच्या गैलाई देवीचे महत्त्व जाणून घ्या

मात्र नोटिसा देऊनही संबंधित चालकांनी कोणतीही उपाययोजना न केल्याने अखेर प्रशासनाला कठोर कारवाईचा बडगा उगारावा लागला. त्यानुसार भोईरवाडी येथील बेकरीचे चालक आणि त्रिमूर्तीनगर येथील बेकरीचे चालक या दोघांच्या बेकऱ्या सील करण्याची कारवाई करण्यात आल्या.

सहाय्यक सहायक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता निरीक्षक प्रमोद नारखडे, प्रशांत पुरी आणि मिलिंद गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.

दरम्यान याच कारवाई दरम्यान डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या विकासकावर कारवाई करण्यात आली.

कारवाई सुरूच राहणार

विकासकाकडून पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू असताना कामाच्या ठिकाणी असलेल्या लोखंडी सळ्या, लोखंडी अँगल, रेती, खडी आणि इतर बांधकाम साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त विखुरलेल्या अवस्थेत ठेवण्यात आल्याचे महापालिका पथकाच्या निदर्शनास आले.

रस्त्यावर अशा प्रकारे बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्यामुळे धुळीचे प्रमाण वाढून हवा प्रदूषण नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्याने सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी संबंधित विकासकाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. यापुढेही अशाच प्रकारे नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news