Kalyan News | डॉक्टर हल्ल्याची कल्याणात पुनरावृत्ती : काटेमानीवलीतील खासगी रूग्णालयातील घटना!

उपचारादरम्यान रूग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरवर हल्ला, कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Kalyan News | डॉक्टर हल्ल्याची कल्याणात पुनरावृत्ती : काटेमानीवलीतील खासगी रूग्णालयातील घटना
Kalyan News | डॉक्टर हल्ल्याची कल्याणात पुनरावृत्ती : काटेमानीवलीतील खासगी रूग्णालयातील घटना
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडे असलेल्या काटेमानीवली परिसरातील एका खासगी रूग्णालयात खळबळजनक घटना समोर आली आहे. उपचाराबाबत माहिती देत असताना एका रूग्णाच्या नातेवाईकाने धक्काबुक्की करत डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिडीत डॉक्टरांनी या घटनेनंतर कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

  भानुज्योती नामक खासगी रूग्णालयात घडलेल्या या प्रकाराबाबत माहिती देताना डॉक्टर युगेंद्र जयस्वाल यांनी सांगितले की, शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास ते जयवंत देशमुख नावाच्या रूग्णाला तपासत होते. सदर रूग्ण फॉलोअपसाठी आला होता. त्याच्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या होत्या. त्यावेळी रूग्णाचा मुलगाही सोबत होता. डॉक्टर त्याला उपचाराविषयी माहिती देत असताना तोच प्रश्न वारंवार विचारून अरेरावीची भाषा वापरू लागला. मी सर्व माहिती दिल्यानंतरही तो मला तू-तू करून बोलत होता आणि तू काय मोठा डॉक्टर लागलाय का ? असे म्हणत शिवीगाळ करू लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Kalyan News | डॉक्टर हल्ल्याची कल्याणात पुनरावृत्ती : काटेमानीवलीतील खासगी रूग्णालयातील घटना
Ramesh Mhatre surrender : महिला डॉक्टर मारहाण प्रकरण, अखेर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांसमोर शरण

    वाद वाढल्यानंतर बाहेर गेलेला तरूण पुन्हा आत येऊन त्याने डॉक्टरला मारहाण केली. यानंतर डॉक्टरांनी ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही.

काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीतील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात एका गर्भवती महिलेच्या उपचारावरून वाद झाल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या तीन साथीदारांनी महिला डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. यामुळे वैद्यकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून डॉक्टर संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news